आज मंगळवेढा येथे भारतीय जनता पार्टी पदाधिकारी यांच्यासमवेत बैठक संपन्न झाली. यावेळी अक्कलकोट विधान सभेचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या मार्गद्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी आ. कल्याणशेट्टी म्हणाले की, पक्षसंघटन मजबूत करण्यासंदर्भात व विविध अभियान राबवणे तसेच शासनाच्या योजना तळागाळात जनतेपर्यंत पोहोचवणे या संदर्भात चर्चा झाली. पंतप्रधान
नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा अभियान राबविण्यासंदर्भात तसेच सशक्त बूथ अभियान संदर्भात आढावा घेतला.
या प्रसंगी आ. समाधान आवताडे, लक्ष्मणराव ढोबळे, शशिकांत चव्हाण, मोगले, औदुंबर वाडदकर, गौरीशंकर बुरकूल, सिद्धेश्वर कोकाटे, गोपाल भगरे, सोमनाथ आवताडे, जमदाडे सर, राजेंद्र सुरवसे व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.