पंढरपूर प्रतिनिधी संपत लवटे
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अंतर्गत रसायनशास्त्र विषयात (डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी )यशस्वीरित्या संपादन केल्याबद्दल त्यांचे सर्व शैक्षणिक स्तरातून कौतुक होत आहे.
डॉ.औदुंबर यांच्या या यशाबद्दल त्यांचे संशोधन मार्गदर्शक प्रा.डॉ.सुरेश ढगे,रसायनशास्त्र विभाग संचालक, प्रा.डॉ.संतोष देवसकर प्रा.डॉ.संगीता माकोणे,प्रा.डॉ.दवणे सर यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या औदुंबर चव्हाण यांनी (Synthesis and characterization of Transition Metal Complexes and their biological activity) हा संशोधन प्रबंध सादर केला आहे. तसेच डॉ. चव्हाण यांचे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय जर्नलस मध्ये(७) संशोधन पेपर प्रसिद्ध झाले आहेत.ग्रामीण भागातून शेतकरी कुटुंबातील एक तरुण असून त्याने अनेक अडचणीवर मात करत हे यश संपादन केले आहे.
चव्हाण याचे पदवीपर्यंत शिक्षण पंढरपूर मधील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय या ठिकाणी पूर्ण झालेआहे.त्यामुळे येथील देखील शिक्षकांनी त्याचे अभिनंदन केले आहे.
डॉ.चव्हाण यांच्या संशोधनामध्ये प्रा. डॉ.राठोड एस.पी,प्रा.डॉ.भगत प्रा.डॉ. मुकुंद माळी, प्रा.डॉ.गौतम गायकवाड यांचे विशेष मार्गदर्शन व सहकार्य मिळाले. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे मित्रपरिवार व कुटुंबातून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.