आळंदी प्रतिनिधी तेज न्यूज
दिवाळी निमित्ताने श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी यांचे वतीने प्रमुख विश्वस्त भावार्थ देखणे विश्वस्त एड राजेंद्र उमाप साहेब,योगी निरंजननाथ,निलेश महाराज लोंढे, पुरुषोत्तम दादा पाटील, एड रोहिणी पवार आणि व्यवस्थापक ज्ञानेश्वर काका वीर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक गायिका वादकांच्या उपस्थितीत आणि रसिकांच्या उदंड प्रतिसादात सकाळ संध्याकाळ दोन्ही सत्रातील दिवाळी संगीत महोत्सव आळंदीकरांची सांस्कृतिक चळवळ बनत असून अनेक नवोदित आणि कला साधकांना हा महोत्सव प्रेरणादायी बनत असून दीवाळी संगीत महोत्सवातील पाचव सायंकालीन स्वरपुष्प महाराष्ट्रातील ख्यातनाम गायिका विदुषी मिनल दातार यांनी गुंफल.
सुरुवातीला श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीने सर्व कलाकारांचा सत्कार ह.भ.प.निलेश बाबा कबीर , व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर विष्णू महाराज सोळुंके यांचे शुभहस्ते करण्यात आला.
त्यानंतर मिनल दातार यांच्या गायनाला सुरुवात झाली त्यांनी सुरूवातीला राग ललीतागौरी सादर करत तसेच पंचम सवारी मध्ये विठूरायावरील स्वरचीत बंदीश सादर करत शास्त्रीय संगीताची सुंदर मेजवानी दिली.
त्यानंतर सुंदर अभंग त्यामध्ये पंढरी निवासा सखा पांडुरंगा, सगुण संपन्न पंढरीच्या राया,माळपदक विठ्ठल, कृष्ण देखिला ,शेवटी अजरामर भैरवी अवघा रंग एक झाला गात रसिकांना सुरेल स्वरांनी मंत्रमुग्ध केले त्यांना तितकीच सुंदर साथसंगत तबला गणेश तानवडे, पखवाज ज्ञानेश्वर दुधाणे, हार्मोनियम लीलाधर चक्रदेव टाळ सदाशिव वाबळे तर स्वरसाथ भुपाली जोशी आणि ज्ञानेश्वरी वाबळे यांनी केली.सुत्रसंचलन उमेश बागडे यांनी सुंदर केले.यावेळी अनेक रसिक कलासाधक, आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवाय हा कार्यक्रम सर्वांसाठी घरी बसल्या पाहता यावा यासाठी लाईव्ह प्रक्षेपण ही संस्थानच्या वतीने करण्यात आले होते त्याचाही लाभ हजारो रसिकांनी घेतला.हा सुंदर संगीत महोत्सव वरचेवर रंगतोय आणि आळंदी करांना सुंदर मेजवानी मिळतेय असा भाव प्रत्येकाच्या चेहऱ्यावर जाणवत होता.
हा संगीत महोत्सव यशस्वी करण्यासाठी संस्थानचे कर्मचारी अधिक परिश्रम घेत आहेत.पुढीलही होणाऱ्या कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने लाभ घेण्याचे आवाहन श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या वतीने करण्यात येत आहे


