सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
संपुर्ण ऊसाचा फड आगीच्या भक्ष्यस्थानी पडला सात लाखांचे झाले नुकसान ऐन दिपावलीतच शिमगा शेतकरी कुटूंब झाले हातबल.त्वरीत पंचनामा करून भरपाई मिळण्याची कूटूबाची मागणी..!!!
ऐनं दिपावली मध्ये बार्शी तालुक्यातील शेळगांव (आर) येथील शेतकरी बाळासाहेब गायकवाड यांच्या मालकीच्या साडेतीन एकरातील ऊसाला विदयुत तारांचे घर्षन होऊन आग लागली .त्यामध्ये उसाचा संपुर्ण फड जळून खाक झाला. या दुर्घटनेमुळे सुमारे सात लाखांचे नुकसान झाले आहे.
दुष्काळाची तीव्रता वाढत असतानाच ही घटना घडल्यामुळे संपूर्ण कुटुंबाला ऐन दिपावलीत शिमगा करण्याची वेळ आली आहे.उस लागनी पासून आजपर्यंत दोन लाखांचा खर्च झाला आहे तो खर्च कर्ज काढून केला होता. यामुळे कुटुंब व्यतीत झाले आहे.
याबाबत तहसीलदारांसह ,विद्युत मंडळ व महसुल विभागाकडे तक्रार केली आहे.गाव कामगार तलाठी ,मंडल अधिकारी यांनी पंचनामा करून आवहाल पाठविण्याची हामी दिली आहे.

