सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
सोलापूर येथील विद्यानिकेतन प्रशाला व हिंगूलाबिका प्राथमिक शाळेत ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षिकांचा भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून लायन्स क्लबचे अध्यक्ष लायन मोहन भूमकर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजकुमार हंचाटे होते. यावेळी संस्थेचे ट्रस्टी जगदीप दंतकाळे, विजय पुकाळे, पुण्याहून खास उपस्थित राहिलेले उद्योगपती अनिल ढवळे, बिराजदार सर, फुटाणे मॅडम तसेच शाळेचे मुख्याध्यापक गोपीचंद नवले सर यांची प्रमुख उपस्थिती होती.
शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांच्या कार्याचा गौरव करताना उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले. शिक्षक हे केवळ ज्ञान देणारे नसून विद्यार्थ्यांना संस्कार, शिस्त आणि जीवनाची योग्य दिशा देणारे मार्गदर्शक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
यावेळी माजी विद्यार्थी तसेच लायन्स क्लबचे अध्यक्ष लायन मोहन भूमकर यांनी मनोगत व्यक्त करून शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. शाळेतील शिक्षक व शिक्षिकांच्या योगदानाचे कौतुक करून त्यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमामुळे शाळेतील शिक्षक, विद्यार्थी, माजी विद्यार्थी व मान्यवरांमध्ये आनंदाचे आणि आपुलकीचे वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

