मुंबई प्रतिनिधी गणेश हिरवे तेज न्यूज
माजी सैनिक चंद्रशेखर सावंत मोटरमन म्हणून पश्चिम रेल्वेमध्ये कार्यरत असताना ०३ जुलै २०१८ रोजी अंधेरी येथील गोखले पुल कोसळत असताना एमर्जेन्सी ब्रेक लावून चर्चगेट लोकल पुलाच्या आधी थांबविली होती.
त्यामुळे शेकडो निष्पाप नागरिकांचे प्राण तसेच रेल्वेचे लाखो रुपयांचे नुकसानही वाचले होते. त्यांच्या या धाडसी कार्याची दखल घेऊन केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी रुपये ५लाख बक्षीस देऊन गौरव केला.
तसेच त्यांच्या देशसेवा व सामाजिक सेवेबद्दल नुकताच त्यांना सैनिक फेडरेशन, महाराष्ट्र राज्य यांनी"सैनिक रत्न"पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या या पुरस्काराची मीरा भाईंदर चे नगरसेवक संजय पवार यांनी दखल घेऊन अभिनंदन व कौतुक केले.

