आज पुन्हा कंडक्टर कडे जुनी पत्र्याची पेटी व तिकीटे पाहयला मिळाली... पत्रकार भारत कवितके
आज पुन्हा कंडक्टर कडे जुनी पत्र्याची पेटी व तिकीटे पाहयला मिळाली... असा अनुभव आल्याचे आमचे मुंबई प्रतिनिधी भारत कवितके यांनी सांगितले.राज्य परिवहन महामंडळाने एनसीएमसी कार्ड अमंलबजावणी करीता १ सप्टेंबर २०२६ पासून सुरुवात केली,पण यामध्ये अनेक समस्या निर्माण होऊन सवलती धारकांनी एनसीएमसी कार्ड काढून कार्यान्वित करुन काही अपेक्षित रक्कम रिचार्ज स्वरूपात भरली, परंतु सर्व्हर डाऊन, मशिन मध्ये कार्यान्वित न होणे, या मुळे रिचार्ज करुनही प्रवाशांना पुन्हा तिकीटाचे पैसे भरुन जुन्या पत्र्याच्या पेटीतील तिकीटे देण्यात आली, एनसीएमसी कार्ड मधील रिचार्ज केलेली रक्कम पुन्हा कधी तरी प्रवासा दरम्यान वापरता येईल असे कंडक्टर कडून सांगण्यात आले, यामुळे प्रवाशांना अधिक आर्थिक भार सहन करावा लागला, महिला वर्गाची यामुळे आर्थिक नाहक गुंतवणूक जादा करावी लागली, या मुळे प्रवाशांमध्ये व कंडक्टर मध्ये वाद निर्माण होऊन ठिकठिकाणी पाहयला मिळत होते, काही सवलती धारकांनी विशेष म्हणजे महिला मोजके पैसे प्रवासा दरम्यान घरुन आणल्याने खूप आर्थिक ओढाताण सहन करावी लागली, आमचे मुंबई प्रतिनिधी भारत कवितके यांना पंढरपूर ते बोरिवली प्रवासा दरम्यान कंडक्टर जुनी पत्र्याची पेटी व जुनी तिकिटे प्रवाशांना देत असल्याचे निदर्शनास आले.एकंदरीत राज्य परिवहन महामंडळाने एनसीएमसी कार्ड अमंलबजावणी करताना सर्व बाबींचा परिपूर्ण विचार करायला हवा होता, योजना हळूहळू गतिमान करण्यासाठी प्रवाशांना होणारा त्रासही कमी होईल याकडे महामंडळाने लक्ष द्यावे.

