पंढरपूर प्रतिनिधी नंदकुमार देशपांडे तेज न्यूज
पंढरपूर येथील संत नामदेव सेवा मंडळ हे गेल्या ४६ वर्षापासुन श्रावण मासात नामदेव गाथा पारायण करीत असून प्रवर्तक वै.प्र.द. निकते गुरूजी यांचा हा वारसा त्यांच्या धर्मपत्नी श्रीमती प्रतिभा प्रकाश निकते यांनी पुढे चालू ठेवला आहे. २००३ पासून पत्राद्वारे नामदेव गाथा अभ्यासक्रम जो सुरू केला आहे तो सुध्दा श्रीमती प्रतिभा निकतेमार्गदर्शक म्हणून सांभाळत आहेत.
या परीक्षा उत्तीर्ण करणारांना नामदेवगाथाव्रती पदवी प्रदान करून गौरव केला जातो.हा वैभव संपन्न सोहळा पुणे येथील हिरकणी भजनी मंडळाच्या सुरेल स्वराने करण्यात आला.
कु.मनाली श्रीनिवास केकडे हिने सादर केलेल्या अमृताहुनी गोड नाम तुझे देवा या भक्ती गीताने रंगतदार झाली.प्रारंभी प्रा.दीपक द.निकते यांच्या प्रास्ताविका नंतर संचालिका श्रीमती प्रतिभा प्रकाश निकते यांनी सर्वांचे स्वागत करून मनोगत व्यक्त केले.
समारंभाचे प्रमुख अतिथी सौ.ज्योती भिंगे व सौ.मृदुला का पुरे यांच्या शुभहस्ते नामदेवगाथाव्रतींचा पदवीदान समारंभ संपन्न झाला.यावेळी स्मिता बनकर, अर्चना देशपांडे, प्रदीप बेंडे आणि शोभना देशपांडे या नामदेवगाथाव्रतींची समयोचित अशी मनोगते झाली.
अध्यक्षस्थानी नाशिकचे नामदेवभक्त सौ.मिनाक्षीआणि त्यांचे सुविध्य पतीराज सुर्यकांत धटिंगण होते.उभयतांच्या भावपूर्ण मार्गदर्शनाने श्रोते भारावून गेले.सौ.रुपाली प्रशांत निकतेंनी समायोजित आभार मानले तर सुत्रसंचलन श्रीमती प्रणाली प्रसन्न निकतेंनी केले. श्री औसेकर महाराज मठामध्ये संपन्न झालेल्या या सोहळ्याला गुरू माऊली गुरूबाबा यांच्या मातोश्रींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून झाली तर संतशिरोमणी नामदेव महाराजांच्या पसायदानाने सांगता झाली.

