अक्कलकोट प्रतिनिधी श्रीशैल गवंडी तेज न्यूज
येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात पुण्यातील स्वामी भक्त रमेश कुंदूर यांनी श्री कैलास पर्वताचे दिव्य दर्शन असलेली प्रतिमा नुकतेच मंदीर समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांच्याकडे सुपूर्द करून श्री स्वामी समर्थांच्या चरणी अर्पण केली.
स्वामी भक्त रमेश कुंदूर यांच्या या आगळ्या वेगळ्या सेवेबद्दल मंदीर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी रमेश कुंदूर यांचा सपत्नीक श्री स्वामी समर्थांचे कॄपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला.
यावेळी बोलताना स्वामी भक्त रमेश कंदूर म्हणाले की या प्रतिमेमध्ये पवित्र श्री कैलास पर्वतावर प्रत्यक्ष दिसणारे भगवान श्री महादेव, माता श्री पार्वती, श्री गणेश आणि इतर देव-देवतांचे दिव्य दर्शन चित्रित केले आहे. यामध्ये श्रीगणेश, श्रीमहादेव, श्रीमहादेव व माता तुळजाभवानी-त्र्यंबक, रिद्धि-सिद्धीसह श्रीगणेश, श्रीशिव-पार्वती प्रतिमा, त्रिमूर्ती श्रीदत्तात्रय, श्रीपांडुरंग, निद्रिस्त श्रीहनुमान अशा दिव्य आकृतींचे दर्शन घडते.
ही दुर्मिळ प्रतिमा मंदिरात भाविकांच्या दर्शनासाठी लावण्यात यावी असा मानस व्यक्त करून या प्रतिमेचे फोटोग्राफी व संशोधन मी स्वतः केले असून सदर प्रतिमा श्री सरस्वती बुक कंपनी पुणे आणि आदर्श विद्यार्थी प्रकाशन, पुणे यांच्याकडून प्रकाशित करण्यात आली असल्याचे स्पष्टीकरण केले.
यावेळी मंदीर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, विपूल जाधव, सागर गोंडाळ व भाविक भक्त उपस्थित होते.

