सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
सोलापूर जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यापासून अपेक्षित प्रमाणात पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकरी कष्टकरी शेतमजूर पशुपालक व्यापारी अत्यंत संकटात सापडलेले आहे. पावसाळा सुरू होऊन तीन महिन्याचा कालावधी लोटला परंतु सगळे नदी धरणे कोरडे झालेले आहेत. त्यामुळे सर्वत्र पिकाचे नुकसान झालेले आहे. शेतकरी राजा चिंता ग्रस्त झालेला आहे. सर्वत्र पिकाचे नुकसान झालेला आहे जिल्ह्याच्या काही भागात पिकांची उगवणी झालेली नाही दुबार पेरणी केलेले शेतकऱ्यांना सुद्धा मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. विहिरी नद्या बोरवेल यांना पाणी कमी झालेला आहे अनेक ठिकाणी प्रशासनाच्या वतीने 20-25 दिवसाला एकदा पाणीपुरवठा होत आहे.
जिल्ह्यातील बहुतांश गावात पिण्याच्या पाण्याचे स्वरूप गंभीर बनलेली आहे त्यामुळे प्रत्येक पिण्याच्या पाण्याची टँकरद्वारे लवकरात लवकर व्यवस्था करावी त्याचबरोबर शेतकरी बांधवांना त्यांचे पिकाचे पंचनामे करून तात्काळ मदत निधी उपलब्ध करून देण्यात यावी. जनावरांचे चारा छावण्या तयार करण्यात यावी मूक जनावर यांचे हाल अत्यंत गंभीर आहे. ग्रामीण भागात रोजगारीचा प्रश्न गंभीर बनत आहे शेतमजुरी कष्टकरी यांच्या हाताला काम नसून शासनाच्या वतीने त्वरित उपाययोजना करावी यासाठी वंचित बहुजन आघाडी सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीने सन्माननीय अप्पर जिल्हाधिकारी अभिजीत पाटील साहेब यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा आणि शहर कार्यकारिणीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

