पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
सध्याच्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांसमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. शेतीच्या कामांसाठी ट्रॅक्टरची आवश्यकता असतानाही आर्थिक परिस्थितीमुळे अनेक शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदी करणे शक्य होत नाही. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी आवश्यक आर्थिक मदत उपलब्ध व्हावी, यासाठी फाटे ट्रॅक्टर्सच्या वतीने विविध बँका व वित्तीय संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली.
या बैठकीत शेतकऱ्यांची सध्याची आर्थिक परिस्थिती, ट्रॅक्टर कर्ज घेताना येणाऱ्या अडचणी तसेच कर्ज मंजुरी प्रक्रियेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. दुष्काळी परिस्थितीचा विचार करून पात्र शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी कर्ज उपलब्ध करून देताना बँका व वित्तीय संस्थांनी सकारात्मक भूमिका घ्यावी, कर्ज प्रक्रिया सुलभ करावी आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आर्थिक सहकार्य करावे, असे आवाहन फाटे ट्रॅक्टर्सच्या वतीने करण्यात आले.
बैठकीस न्यू हॉलांड कंपनीचे टेरिटरी मॅनेजर सचिन वडवले यांच्यासह ॲक्सिस बँकेचे संदीप वाघमारे, इंडसइंड बँकेचे अरबाज शेख, एयू स्मॉल फायनान्स बँकेचे मयूर चिखलकर, आयडीएफसी फर्स्ट बँकेचे अमोल शिंदे, एल अँड टी फायनान्सचे जमीर बागवान व टायगर कॅपिटलचे लक्ष्मण मेहतराव उपस्थित होते.
यावेळी फाटे ट्रॅक्टर्सचे डीलर नागेश फाटे, रमेश फाटे, शुभम फाटे, शशांक फाटे तसेच सेल्स मॅनेजर संतोष पुणेकर उपस्थित होते. उपस्थित बँक अधिकारी व वित्तीय संस्थांच्या प्रतिनिधींचा फाटे ट्रॅक्टर्सच्या वतीने सत्कार करण्यात आला.
दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना शेतीची कामे सुरळीतपणे करता यावीत आणि आधुनिक शेतीसाठी आवश्यक यंत्रसामग्री उपलब्ध व्हावी, यासाठी बँकांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहावे, अशी अपेक्षा या बैठकीत व्यक्त करण्यात आली.

