भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्सच्या वतीने रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त उत्साहात रॅलीचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन संभाजी शिंदे यांच्या हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी सरपंच रणजित जाधव, उपसरपंच नितीन शिंदे, सेवानिवृत्त शिक्षक भीमराव जाधव, प्राचार्य के. डी. शिंदे, राजू कारंडे, राजू बिडवे, प्रशांत माळवदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी कला शिक्षक खरात यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रायगड येथील समाधी स्थळाची प्रतिकृती तयार केली होती.त्यामध्ये आण्णाच्या प्रतिमा ठेवण्यात आली होती.
यानंतर विद्यार्थ्यांनी लेझीम, टिपरी तसेच ढोल-ताशांच्या गजरात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयघोषात उत्साहपूर्ण रॅली काढली. रॅलीत विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.
या कार्यक्रमास विद्यार्थी, पालक, शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कर्मवीर अण्णांच्या शैक्षणिक कार्याचा व समाजप्रबोधनाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम उत्साहात पार पडला.
यावेळी ग्रामपंचायत कार्यालय येथे रॉली तील विध्यार्थीना सरपंच रणजित जाधव यांच्या वतीने नाष्ट्याचे आयोजन करण्यात आले होते. अल्पोपार वाटप करताना पंचायत समिती सदस्य विजय शिंदे, सकल मराठा समाजाचे नेते धैर्यसिह निंबाळकर,सहकार शिरोमणी चे संचालक सुनील पाटील ग्रामपंचायत सदस्य पोपट इंगोले युवा नेते निहाल शेख, सुहास सराटे,सागर चौगुले, सुजित हैबत्ती, श्रीनिवास बोधे शिवराज जाधव उपस्थित होते.याला विद्यार्थ्यांनी मोठा प्रतिसाद दिला.


