अक्कलकोट प्रतिनिधी तेज न्यूज
श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान संचलित श्री स्वामी समर्थ रुग्णालय, अक्कलकोट येथे विराजमान झालेल्या गणरायाचे विसर्जन मोठ्या भक्तीभावाने व उत्साहात करण्यात आले.
या पावन प्रसंगी रुग्णालयाचे अध्यक्ष महेश इंगळे यांच्या हस्ते श्री गणेशाचे विधिवत विसर्जन करण्यात आले. यावेळी "गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या" चा जयघोष करण्यात आला.
याप्रसंगी युवा नेतृत्व प्रथमेश मालक इंगळे, आत्माराम घाटगे सर, हॉस्पिटलचे प्रमुख मनोज काटगावकर, रविकांत मलवे, युवराज सोनटक्के, तन्मय इचगे, समर्थ भोसले, तुषार मोरे, अमोल महाडिक, लखन सुरवसे, रजत गायकवाड, अवधूत पवार, लकी कुरले यांच्यासह हॉस्पिटलचे सर्व विभागाचे डॉक्टर्स, कर्मचारी, रुग्ण व नागरिक मोठ्या संख्येने भक्तीभावाने उपस्थित होते.

