पुणे प्रतिनिधी सागर बोदगिरे तेज न्यूज
स्मृतीस्थळांच्या संवर्धनासाठी डॉ. गौरव घोडे आणि कार्यकर्त्यांची ही दुसरी मोहीम आहे. यापूर्वी कर्नाटकातील श्री शहाजी महाराजांच्या समाधीवरही मेघडंबरी उभारण्यात आली होती. त्यानंतर कणकगिरी येथील संभाजी महाराजांच्या स्मृतीस्थळासाठी पुढाकार घेत ही मोहीम यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली.
या दोन्ही ऐतिहासिक स्थळांचे संवर्धन, संरक्षण आणि विकास यासाठी शासनाने विशेष लक्ष देण्याची गरज आहे. भविष्यात या स्मृतीस्थळांकडे दुर्लक्ष होऊ नये आणि छत्रपती घराण्याचा ऐतिहासिक वारसा जतन व्हावा, यासाठी महाराष्ट्र सरकारने कर्नाटक सरकारशी समन्वय साधून ठोस पावले उचलावीत, अशी मागणी डॉ. गौरव घोडे यांनी केली.
“छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि शहाजी महाराज यांचा इतिहास हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि अभिमानाचा ठेवा आहे. या ऐतिहासिक स्मृतीस्थळांचे संरक्षण आणि संवर्धन करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. शासनाने या स्थळांकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्यांचा विकास व संवर्धन करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात,” अशी कळकळीची विनंती डॉ. गौरव घोडे यांनी केली.
या उपक्रमासाठी डॉ. गौरव घोडे यांच्या मार्गदर्शनाखाली धर्मवीर शिवसेना आध्यात्मिक सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच श्री स्वामी ॐ मल्हारी प्रतिष्ठानचे गुरुदत्त शेळके,प्रदीप तिकोणे,श्रीकांत रेणके,अविनाश पवार,सुनिल ढवळे,आदर्श कांबळे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भक्तगणांनी मोलाचे सहकार्य केले.

