गादेगाव प्रतिनिधी तेज न्यूज
मेहनत, जिद्द आणि सातत्याच्या जोरावर गादेगाव येथील चि. सुयोग शिवाजी फाटे यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात आलेल्या परीक्षेत महसूल सहाय्यक पदावर, तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) परीक्षेत Executive Assistant पदावर त्यांची एकाच वर्षात निवड झाली आहे. या दुहेरी यशाबद्दल त्यांचा नागेश (दादा) फाटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सुयोग फाटे यांनी स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी सातत्याने मेहनत घेतली. नियोजनबद्ध अभ्यास, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी हे यश संपादन केले. ग्रामीण भागातून स्पर्धा परीक्षेत यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांची कामगिरी प्रेरणादायी ठरली आहे.
MPSCच्या माध्यमातून महसूल सहाय्यक पदावर निवड झाल्याने त्यांना महसूल विभागात सेवा करण्याची संधी मिळणार आहे. तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेतील Executive Assistant पदाच्या निवडीमुळे मुंबई महानगराच्या प्रशासकीय व्यवस्थेत काम करण्याची संधी त्यांना मिळाली आहे.
सुयोग हे शिवाजी फाटे यांचे सुपुत्र असून, त्यांच्या यशामुळे गादेगावच्या शैक्षणिक क्षेत्राच्या लौकिकात भर पडली आहे. त्यांच्या या यशामुळे परिसरातील विद्यार्थ्यांमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सुयोग फाटे यांच्या यशाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, महाराष्ट्र राज्य उद्योग व व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष मा. श्री. नागेश (दादा) फाटे यांनी त्यांचे अभिनंदन केले. “मेहनत, जिद्द आणि सातत्याच्या जोरावर सुयोगने मिळविलेले हे यश कौतुकास्पद आहे. ग्रामीण भागातील तरुणांनी मोठी स्वप्ने पाहून ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत, असा संदेश त्याच्या यशातून मिळतो. त्याच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा,” असे नागेश फाटे यांनी सांगितले.
यावेळी रमेश फाटे, शुभम फाटे, शशांक फाटे, संग्राम कापसे, सुमित बागल, योगेश फाटे, संतोष पुणेकर, विनोद मासाळ, निवृत्ती भाटकर, विनय शिंदे, तेजस देवकते, मोनेश्वर रोपळकर, शरद थिटे, कृष्णा पवार, श्रीधर पिसे आदी मान्यवर उपस्थित होते.
सुयोग फाटे यांच्या या दुहेरी यशाबद्दल कुटुंबीय, मित्रमंडळी आणि ग्रामस्थांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छा दिल्या जात आहेत.

