पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील मतदारसंघ संघटनात्मक आढावा व विचारविनिमय बैठकीचे आयोजन रविवार, दि. ९ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १२ वाजता योगभवन, एलआयसी ऑफिसच्या पाठीमागे, पंढरपूर येथे करण्यात आले आहे.
या बैठकीस सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख व उपनेत्या सुषमाताई अंधारे उपस्थित राहून संघटनात्मक आढावा घेणार असून मार्गदर्शन करणार आहेत. तसेच जिल्हाप्रमुख संभाजीराजे शिंदे आणि महिला आघाडी संपर्क संघटिका पंढरपूर-सांगोला विधानसभा सिमाताई सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक होणार आहे.
बैठकीत पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील पक्षाच्या संघटनात्मक कामाचा आढावा, आगामी राजकीय वाटचाल तसेच विविध विषयांवर विचारविनिमय करण्यात येणार आहे.
या बैठकीस शिवसेना व युवासेना तसेच शिव आरोग्य सेना, ग्राहक संरक्षण कक्ष, शेतकरी सेना आदी अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी, महिला आघाडीच्या पदाधिकारी, उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, शहरप्रमुख, उपतालुकाप्रमुख, विभागप्रमुख, गटप्रमुख, शाखाप्रमुख तसेच आजी-माजी पदाधिकारी, ज्येष्ठ शिवसैनिक व शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाप्रमुख संभाजीराजे शिंदे यांनी केले आहे.
“शिवसेना आहे... तर सर्व काही आहे!” या घोषवाक्यासह पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला अधिक बळकटी देण्यासाठी ही बैठक महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

