भारत कवितके प्रतिनिधी मुंबई कांदिवली पश्चिम तेज न्यूज
पाव्हणं जरा जपून हा जुन्या काळातील लावण्या नवीन संकल्पना घेऊन सादर केलेला जुन्या मराठी अभिनेत्रींच्या आठवणींना उजाळा देणारा लावणी कार्यक्रम पाहण्याचा योग आला.
आमचे मुंबई प्रतिनिधी भारत कवितके यांना या कार्यक्रमाचे आयोजक हरि पाटणकर यांनी सांगितले की, लावणी प्रेक्षकांना काही तरी नवीन देण्याच्या संकल्पनेतून हा लावणी कार्यक्रम तयार केला आहे.संध्या, जयश्री गडकर, सुलोचना, विठाबाई,लिला गांधी, उषा चव्हाण,मधु कांबीकर, उषा नाईक वगैरे वगैरे अभिनेत्रींनी पूर्वी चित्रपटाद्वारे सादर केलेल्या आठवणींत राहतील अशा लावण्या या कार्यक्रमात घेण्यात आल्या आहेत."
सुरुवातीला गण झाला, त्यानंतर खऱ्या अर्थाने कार्यक्रमाची सुरुवात झाली, यातील नृत्यांगना नेहा बैरागी, रेश्मा पाटील, भूमिका भोसले,सोनी,व इतर सहकारी नृत्यांगना यांनी जुन्या अभिनेत्री च्या लावण्या सादर करून रसिकांची मने जिंकली.गौळण ऐन दुपारी खोडी कशी काढली,बाई माझी करंगळी मोडली,अरे मनमोहना रे साधी भोळी मिरा तुला कळली नाही, आणि लावण्या मी एकलीच निजले...बाई मला इष्काची इंगळी डसली,नटले तुमच्या साठी, माझ्या वरती रसिक जनांच्या नजरा दिलवरा करते तुला मुजरा, माझ्या झाडावरती चढ चढू नका, कुण्या गावाचं आलं पाखरू,छबीदार छबी मी तोऱ्यात उभी, कुणी तरी न्याव मला फिरवायला, ढोलकीच्या तालावर घुंगराच्या बोलावर, मला लागली कुणाची उचकी,घ्याल का हो राया एक शालू बनारसी,लाल पैठणी रंग माझ्या चोळीला, लटपट लटपट तुझं चालणं, कुणी तरी बोलवा दाजीबाला, कुठं कुठं जायचं हनिमूनला, बुगडी माझी सांडली ग जाता साताऱ्याला,नाचू किती नाचू किती कंबर लचकली,बाई मी पतंग उडवीत होते आणि शेवटी भैरवी रागातील लावणी पोटा साठी नाचते मी पर्वा कुणाची.
अशा लावण्या सादर करुन धमाल उडवून दिली.वादक,गायक, नृत्य दिग्दर्शक,प्रकाश योजना, यांनी या कार्यक्रमाला उत्तम साथ दिली.

