अॅड. श्रीनिवास कटकूर यांचा युक्तिवाद ठरला निर्णायक
सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
सोलापूर येथील व्यावसायिक जगदीश यांनी दाखल केलेल्या नियमित दिवाणी अपीलात मे. जिल्हा न्यायालयाने shri S .D. Indalkar Saheb यांनी मे.कनिष्ठ दिवाणी न्यायालयाचा दावा फेटाळण्याचा आदेश रद्दबातल ठरवत जगदीश यांच्या बाजूने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे.
ॲडहॉक जिल्हा न्यायाधीश-१ एस. डी. इंदलकर यांच्या न्यायालयाने हा निकाल दिला असून मूळ दावा पुन्हा पूर्ववत नोंदवून गुणवत्तेवर (Merits) चालवण्याचे आदेश दिले आहेत.
प्रकरणाची थोडक्यात पार्श्वभूमी:
जगदीश यांनी संतोष यांच्याकडून साखर पेठेतील महानगरपालिका घर ही ५१५ चौ. फुटांची मिळकत ९ लाख रुपयांत खरेदी करण्याचे ठरवून २८/०८/२०२५ रोजी साठेखत केले होते. त्यापोटी ५ लाख रुपये धनादेशाद्वारे अदा करून एका खोलीचा ताबाही मिळवला होता. मात्र, ठरलेल्या तीन महिन्यांच्या मुदतीपूर्वीच संतोष यांनी मिळकत अन्य व्यक्तीला विकण्याचा व ताबा हिरावून घेण्याचा प्रयत्न केल्याने जगदीश यांनी मे.दिवाणी न्यायालयात कायमस्वरूपी मनाई हुकूमाचा (Perpetual Injunction) दावा दाखल केला होता.
त्यावर प्रतिवादी संतोशने 'ऑर्डर ७, रूल ११' अन्वये अर्ज (Exh. 13) करून दावा चालवण्यास कायदेशीर कारण (Cause of Action) नाही, असा दावा केला.
६ व्या सहदिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) यांनी तो अर्ज मंजूर करत ०९/०२/२०२६ रोजी जगदीश यांचा दावा फेटाळला होता.
अपील न्यायालयात अॅड. श्रीनिवास कटकूर यांचा प्रभावी युक्तिवाद:
दिवाणी न्यायालयाच्या या आदेशाविरुद्ध जगदीश यांनी मे. जिल्हा न्यायालयात अपील दाखल केले. जगदीश यांच्या वतीने निष्णात विधिज्ञ अॅड. श्रीनिवास कटकूर (Adv. Srinivas Katkur) यांनी न्यायालयासमोर युक्तिवाद मांडला.
* अॅड. श्रीनिवास कटकूर यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, दावा फेटाळताना केवळ दाव्यातील मजकूर विचारात घेणे आवश्यक असते, प्रतिवादीचा बचाव नव्हे.
* मनाई हुकूम मागण्याचे कारण आणि खरेदीखत करून घेण्याचे (Specific Performance) कारण स्वतंत्र असून, मुदत संपण्यापूर्वीच प्रतिवादीने मिळकतीत तिसऱ्या व्यक्तीचा संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याने मनाई हुकूमाचा दावा पूर्णपणे योग्य व कायद्यानुसार ग्राह्य आहे.
* विविध न्यायनिर्णयांचा दाखला देत कनिष्ठ न्यायालयाने दिलेला आदेश कायद्याला धरून नसल्याचे अॅड. कटकूर यांनी सिद्ध केले.
न्यायालयाचा निकाल
जिल्हा न्यायालयाने अॅड. श्रीनिवास कटकूर यांचा युक्तिवाद ग्राह्य धरत कनिष्ठ न्यायालयाचा दावा फेटाळण्याचा आदेश व हुकूमनामा रद्द केला. तसेच मूळ दिवाणी दावा पूर्ववत क्रमांक देऊन पुन्हा गुणवत्तेवर चालवण्यासाठी मे.कनिष्ठ दिवाणी न्यायालयाकडे पाठवला आहे. या निकालामुळे जगदीश यांना मोठा न्याय मिळाला आहे.
याकामी जगदीश यांचेवतीने ऍड. श्रीनीवास कटकुर व ऍड. आकाश आयंची यांनी काम पाहिले आहे.

