मुंबई प्रतिनिधी गणेश हिरवे तेज न्यूज
रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाती समाज, मुंबई संस्थेचे अध्यक्ष मोतीराम विश्वासराव, कार्याध्यक्ष सहदेव सावंत तसेच आर.जे.एम.डी.एस. इंग्लिश स्कूलचे सीईओ दीपक खानविलकर यांनी महाराष्ट्र राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक मंत्री मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. आशीषजी शेलार यांची सदिच्छा भेट घेऊन संस्था चालवत असलेल्या बालविकास विद्यामंदिर व आरजेएमडीएस इंग्लिश स्कूल या दोन्ही शाळांची सविस्तर माहिती देऊन शिक्षण क्षेत्रासह सामाजिक व संस्थात्मक कामकाजात येणाऱ्या विविध अडचणींबाबत सविस्तर चर्चा केली.
या भेटीदरम्यान शाळा व शैक्षणिक संस्थांना भेडसावणाऱ्या विविध समस्या, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आवश्यक सुविधा, संस्थांच्या माध्यमातून राबविण्यात येणारे सामाजिक व शैक्षणिक उपक्रम तसेच भविष्यातील विकासाच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
शिक्षण क्षेत्रातील प्रत्यक्ष अडचणी आणि संस्थांच्या माध्यमातून समाजासाठी सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती शिष्टमंडळाने पालकमंत्री आशीष शेलार यांना दिली. यावेळी त्यांनी सर्व विषय समजून घेत सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित प्रश्नांवर योग्य मार्गदर्शन केले. शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रातील विधायक उपक्रमांना शासनाच्या माध्यमातून आवश्यक ते सहकार्य करण्याची भूमिका त्यांनी व्यक्त केली.
“शिक्षण क्षेत्राचा विकास आणि विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे ही सामूहिक जबाबदारी आहे. संस्थांनी विधायक पद्धतीने मांडलेल्या प्रश्नांवर निश्चितच सकारात्मक विचार केला जाईल,” अशी भूमिका पालकमंत्री आशीष शेलार यांनी व्यक्त केल्याचे शिष्टमंडळाने सांगितले.
या भेटीमुळे शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्नांना योग्य व्यासपीठ मिळण्यासोबतच सामाजिक व शैक्षणिक संस्थांच्या भविष्यातील कार्याला अधिक बळ मिळेल, असा विश्वास अध्यक्ष मोतीराम विश्वासराव, कार्याध्यक्ष सहदेव सावंत आणि सीईओ दीपक खानविलकर यांनी व्यक्त केला.
शिक्षण, सामाजिक बांधिलकी आणि संस्थात्मक विकासासाठी झालेली ही भेट सकारात्मक व फलदायी ठरली.

