मुंबई प्रतिनिधी गणेश हिरवे तेज न्यूज
'गाणी आठवणीतली' हा मंगेशकर कुटुंबीयांच्या अजरामर रचनांवर आधारित संगीत कार्यक्रम राम गणेश गडकरी रंगायतनात सहकुटुंब अनुभवण्याचा योग आला.
गौरी पाटील यांच्या संकल्पनेतुन साकारलेल्या ट्यून प्रॉडक्शन्स आणि गीतांजली म्युझिकल्स आयोजित हा कार्यक्रम गौरी पाटील, हृषिकेश रानडे, धनश्री देशपांडे या गायकांच्या सुमधुर गायकीने संस्मरणीय असा ठरला. सत्यजित प्रभू यांचे संगीत संयोजन, डॉ. समीरा गुजर यांचे प्रभावी सूत्रसंचालन आणि अनेक आधुनिक - पारंपरिक वाद्यांनी परिपूर्ण असा वाद्यवृंद यामुळे कार्यक्रमाला मंगेशकर या नावाची उंची प्राप्त झाली. मंगेशकर भावंडे ही महाराष्ट्राला लाभलेली एक सांगित्यिक देणगी आहे ज्यांनी संपूर्ण देशाला आपल्या सुमधुर आवाज आणि गीत संगीताने समृद्ध केले आहे. त्यामुळे एका सदाबहार आणि मंगेशकर कुटुंबाचे संगीत क्षेत्रातील योगदान पटवून देणाऱ्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे समाधान लाभले.
एखाद्या संगीत कार्यक्रमाने रंगायतन हाऊसफुल्ल होण्याचा प्रसंग बऱ्याच दिवसांनी पाहायला मिळाला. जवळपास प्रत्येक गीतास ठाणेकरांचा वन्स मोअर होता. मंगेशकरांची मराठीतील अनेक चित्रपट गीते, कोळी गीते, नाट्यसंगीत, लावणी तीन तासांत ऐकायला मिळाली. 'अखेरचा हा तुला दंडवत' या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. साहित्यिक कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचा नेहमीच योग येतो
मात्र एका परिपूर्ण, प्रभावशाली आणि अनुभवसंपन्न कलावंतांच्या कलेने नटलेला संगीत कार्यक्रम बऱ्याच दिवसांनी मनसोक्त अनुभवता आला. कार्यक्रमानांतर मंचावर ठाणे महानगरपालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ प्रसाद पाटील आणि आयोजक गायक गौरी पाटील यांची भेट घेत निरोप घेतला.

