पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. वीर फकिरा फाउंडेशनच्या वतीने तुळशी ता. माढा येथे दिनांक. 9 ऑगस्ट 2026 रोजी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा , पोलिस गौरव पुरस्कार सोहळा व डॉक्टर गौरव पुरस्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
‘''लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना'' या विषयावर ॲड. संदिप कागदे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात होते. ह्या वेळी त्यांनी उपस्थिताना प्रभावी मार्गदर्शन केले.
सदर व्याख्याना मध्ये भारतीय राज्यघटना, मूलभूत अधिकार, अभिव्यक्ती स्वतंत्र, युवकांची भूमिका तसेच अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य ह्यावर मार्गदर्शन केले.
ॲड. संदिप कागदे यांचे शिक्षण बी. एस. सी., एल. एल. एम., सेट, नेट. (B.Sc.,L.L.M.,S.E.T., N.E.T) आहे. त्यांना विधी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्या बद्दल व महत्वपूर्ण योगदान दिल्या बद्दल विश्वभूषण डॉ. बाबा साहेब आंबेडकर प्रतिष्ठान पंढरपूर च्या वतीने "विधीज्ञ राज्यस्तरीय पुरस्कार" देउन गौरवण्यात आले आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. समाजकल्याण सभापती शिवाजी नाना कांबळे होते. प्रमुख उपस्थितीमध्ये तुळशीचे सरपंच डॉ. शरद मोरे, उपसरपंच दिगंबर माळी ,वीर फकिरा फाउंडेशनचे अध्यक्ष शरद लोखंडे , कवी व लेखक किरण निकम यांच्या सह सामाजिक,राजकीय क्षेत्रातील मान्यवर
विद्यार्थी, युवक, नागरिक व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.सदर कार्यक्रमांस उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचे आयोजन लोकआधार फाउंडेशनचे अध्यक्ष कवी-लेखक किरण निकम यांच्या पुढाकाराने करण्यात आले.

