माळशिरस प्रतिनिधी संजय निंबाळकर तेज न्यूज
निमगाव, अकलूज व पिलीव परिसरातील नागरिक, विद्यार्थी, नोकरदार, शेतकरी तसेच सर्वसामान्य प्रवाशांची एस.टी. बससेवा सुरू करण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित होती. या मार्गावरील नागरिकांना प्रवासासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.
नागरिकांची ही अडचण लक्षात घेऊन माळशिरस तालुक्याचे कर्तव्यदक्ष सभापती मा. श्री. दत्ता भैय्या मगर यांनी संबंधित प्रशासन व एस.टी. महामंडळाकडे सातत्याने पाठपुरावा करून ही बससेवा सुरू करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
या प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून निमगाव – अकलूज – निमगाव – पिलीव या मार्गावर एस.टी. बससेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांची प्रवासाची मोठी गैरसोय दूर होणार असून विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी, कामगार व नोकरदार वर्गाला याचा मोठा फायदा होणार आहे.
जनतेच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे, हाच खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधीचा धर्म!
जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देत विकासकामांसाठी सदैव तत्पर असणारे दत्ता भैय्या मगर यांच्या प्रयत्नातून आणखी एक महत्त्वपूर्ण सुविधा नागरिकांच्या सेवेत दाखल झाली आहे.

