पुणे प्रतिनिधी तेज न्यूज
अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघ, नवी दिल्ली महाराष्ट्र राज्य अध्यक्ष पदी संतोष मुळे यांची निवड करण्यात आली आहे.
यावेळी भास्करावजी टाँपे , ज्याला प्रसादजी नामदेव, एस.एस. टोनी, डॉ. एन.जी.पाथरकर, राजपाल रोहिला, एम.एल. नामदेव, बलजीतसिंग खुरपा, राजेंद्र नामदेव, महादेव खटावकर, कमल किशोर वर्मा, अनंतरावजी जांगजोड , डॉ. प्रवीण खोड़े _, दिल्लीतील सर्व मान्यवर पदाधिकारी, ज्येष्ठ मंडळी, मातृशक्ती, युवा शक्ती आणि तमाम समाज बांधव-भगिनीं उपस्थित होत्या.
यावेळी संतोष मुळे म्हणाले की आजचा हा क्षण माझ्यासाठी केवळ आनंदाचा नाही तर अभिमानाचा आणि जबाबदारीचा क्षण आहे. आपण सर्वांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी ऋणी आहे.
तालुका पातळीवर काम करणाऱ्या एका सामान्य कार्यकर्त्याला राष्ट्रीय स्तरावरील या शिखर संस्थेचे महाराष्ट्राचे अध्यक्षपद मिळणे ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. पण हे पद माझ्यासाठी सन्मान नाही, हे पद माझ्यासाठी संघर्षाची नवी सुरुवात आहे!
*आगामी ध्येय आणि संकल्प:*
- *गाव तिथे कार्यकर्ता!*
- *तालुका तिथे संघटना!*
- *जिल्हा तिथे नेतृत्व!*
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात संघटना पोहोचवणे. प्रत्येक जिल्हा आणि तालुक्यात कार्यकर्त्यांची फळी उभी करणे.समाजातील प्रत्येक पोटजातीला, प्रत्येक घटकाला एका झेंड्याखाली एकत्र आणणे.कारण आपली ताकद कोणत्याही व्यक्तीत नाही, आपली खरी ताकद आपल्या एकजुटीत आहे!
माझे वचन:
पदासाठी नाही, समाजासाठी काम करीन!
प्रसिद्धीसाठी नाही, संघटनेसाठी काम करीन!
स्वतःसाठी नाही, समाजाच्या एकत्रिकरणासाठी काम करीन!युवा शक्तीने पुढे यावे, महिला शक्तीने नेतृत्व करावे आणि ज्येष्ठांनी मार्गदर्शन करावे. संत नामदेव महाराजांनी दिलेला समता, बंधुता आणि एकतेचा संदेश महाराष्ट्राच्या प्रत्येक घरापर्यंत पोहोचवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.
चला, आजपासून एक नवा अध्याय सुरू करूया!
_एक समाज — एक विचार!_
_एक संघटना — एक नेतृत्व!_
_एक ध्येय — समाजाची प्रगती!_
सर्व समाज बांधव व माता भगिनींना श्री संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या समाधी सोहळ्यानिमित्त खूप खूप शुभेच्छा दिल्या.

