जुजारपूर प्रतिनिधी तेज न्यूज
सांगोला तालुक्यातील जुजारपूर येथे आयोजित कार्यक्रमादरम्यान ज्येष्ठ पत्रकार मा. अभय दिवाणजी सर यांच्याशी विविध विषयांवर चर्चा करण्याचा योग आला. ड्रीम फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. काशिनाथ भतगुणकी सर यांनी ही भेट घडवून आणली.
यावेळी पत्रकारिता, सामाजिक कार्य तसेच ग्रामीण भागातील विविध प्रश्नांवर मनमोकळी चर्चा झाली. ज्येष्ठ पत्रकार अभय दिवाणजी यांचे अनुभव व मार्गदर्शन यामुळे ही भेट विशेष संस्मरणीय ठरली.
तेज न्यूज च्या माध्यमातून 10 हजार पेक्षा जास्त बातम्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत हे समजल्या वर विशेष कौतुक केले. आणि शुभेच्छा दिल्या.

