जोगेश्वरी प्रतिनिधी गणेश हिरवे तेज न्यूज
रत्नागिरी जिल्हा मराठा न्याती समाज, मुंबई यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थी व सभासदांचा गुणगौरव सोहळा ९ ऑगस्ट रोजी जोगेश्वरी येथे आयोजित करण्यात आला होता.
नव्या पिढीला प्रेरणा मिळावी, त्यांच्या यशाची कौतुक व्हावे तसेच समाज्यामध्ये शैक्षणिक व सामाजिक प्रगतीची जाणीव दृढ व्हावी या उद्देशाने संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थी व कर्तृत्ववान सभासदांना सन्मानित करण्यात आले. माजी सैनिक चंद्रशेखर सावंत यांना त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल घेऊन सन्मानित करण्यात आले.
संस्थेचे कार्याध्यक्ष सहदेव सावंत,सरचिटणीस जितेंद्र पवार तसेच स्पर्धापरीक्षा मार्गदर्शक संजय मोरे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. श्रीमती सुरक्षा घोसाळकर यांनी शानदार सूत्रसंचालन केले.या कार्यक्रमाला बहुसंख्येने विद्यार्थी,पालक व संस्थेचे सभासद हजर राहिले.

