अकलूज प्रतिनिधी तेज न्यूज
अकलूज येथील विठ्ठल मंदीर येथे संत परंपरेतील महान संत, वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आज अकलूज येथे विविध धार्मिक व भक्तिमय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
टाळ-मृदंगाचा गजर, हरिनामाचा जयघोष आणि भाविकांच्या अपार श्रद्धेने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात हा पवित्र सोहळा संपन्न झाला.
यावेळी महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह (दादासाहेब) मोहिते पाटील, अकलूज नगरपरिषद लोकनियुक्त प्रथम नगराध्यकशा रेश्माताई अडगळे, माळशिरस पंचायत समीती माजी सदस्या हेमलताताई चांडोले, अकलूज पंचक्रोशीतील नागरिक, सर्व समाज बांधव, महिला, विविध क्षेत्रातील आजी माजी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.
संत नामदेव महाराजांनी आपल्या अभंगवाणीमधून समाजाला भक्ती, समता, मानवता आणि बंधुभावाचा दिलेला संदेश आजही समाजाला प्रेरणा व योग्य दिशा देणारा आहे.

