पुणे प्रतिनिधी तेज न्यूज
रिवा फाउंडेशन सामाजिक संस्था, पुणे आणि यारे रॉकस्टार म्युझिकल यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच सर्व कलाकार मित्र परिवार, पुणे जिल्हा यांच्या सहकार्याने ‘सुने अनसुने’ सदाबहार गीतांचा बहारदार संगीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
हा विशेष कार्यक्रम मंगळवार, दि. ११ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ४.३० ते रात्री ८ वाजेपर्यंत चिंचवड येथील रामकृष्ण मोरे सभागृह येथे होणार आहे.
कार्यक्रमात जुन्या काळातील गाजलेली आणि रसिकांच्या मनावर आजही अधिराज्य गाजवणारी सदाबहार हिंदी गीतांची मेजवानी सादर केली जाणार आहे. विविध प्रसिद्ध गायक-गायिका, कलाकार आणि संगीत क्षेत्रातील मान्यवर या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
कार्यक्रमासाठी सौ. कविता पलांडे (मॉडेल/नृत्यांगना, कलाकार गायिका), योगेश कापडे, अनुपमदा घुले यांच्यासह अनेक कलाकारांची उपस्थिती राहणार आहे. तसेच विविध प्रसिद्ध गायक-गायिकांकडून सदाबहार गीतांचे सादरीकरण करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून संगीत रसिकांना जुन्या सुवर्णकाळातील लोकप्रिय गीतांचा आनंद घेता येणार असून, कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
स्थळ : रामकृष्ण मोरे सभागृह, चिंचवड, पुणे
दिनांक : मंगळवार, ११ ऑगस्ट २०२६
वेळ : सायं. ४.३० ते रात्री ८.०० वा.
संपर्क : ८४०८८४१६८९ / ९२०९८ ४४५७६

