कोल्हापूर प्रतिनिधी तेज न्यूज
के. एस. आय. पब्लिकेशन, कोल्हापूर यांच्या वतीने ३० वे मराठी ग्रामीण साहित्य संमेलन रविवार, दि. २३ ऑगस्ट २०२६ रोजी आळंदी, पुणे येथे विविध साहित्यिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांनी उत्साहात संपन्न झाले.
संमेलनाचे अध्यक्ष दशरथ बाबासाहेब धायगुडे, बोरी, सातारा यांनी भूषवले तर उद्घाटक कवी दीपक पवार, रुकडी यांचे हस्ते करण्यात आले स्वागताध्यक्ष प्रा. सी.ए. डॉ. शंकर घनश्यामदास अंदानी, पुणे, यांनी सर्वांचे स्वगतपर . विचार मांडले . प्रमुख मार्गदर्शक डॉ. श्रीकांत श्रीपती पाटील, कोल्हापूर यांनी . आपले विचार व्यक्त करून साहित्य विषयक मागदर्शन केले .
तसेच माया नवथर, छत्रपती संभाजीनगर आणि श्रीमती वाणी वेणूमाधव केरकलमट्टी, डोंबिवली रोहित गांवकर गोवा यांची प्रमुख उपस्थिती लाभली . दुपारी बाळासाहेब देशमुख यांचे कथाकथन, अनिल बाबासो दानोळे (दिवाणजी), इंगळी यांचे लोकनृत्य वासुदेव आणि प्रा. सी.ए. डॉ. शंकर घनश्यामदास अंदानी यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन पार पडले .
संमेलनाच्या निमित्ताने ‘भावनांचे इंद्रधनुष्य’, संपादन अशोक मोहिते ‘युनिव्हर्स : अंतर्मनाचा अंतर्नाद’, कु अनुराधा कराळे ‘स्मृतींचा काव्यसागर’, ‘अभंग वाणी’, विनायक पाटील ‘सुख शोधता शोधता’, ‘ भारत कवितके थोडं मनातलं’, सुमननाई मुठे ‘तुझ्या आठवणीत’, सरोजा गायकवाड ‘सुभाषित-गंध’, हिंगणकर पुरुषोत्तम महाराज ‘तू फक्त माणूस हो..! शितलांजली उर्फ डॉ. संगिता महाजन रोटे आदी पुस्तकांचे प्रकाशन तसेच ‘आळंदी संमेलन विशेषांक’ प्रकाशित करण्यात आली .
दुपारी ४ वाजता चित्रा दिक्षित, बॉलिवूड अभिनेत्री, मुंबई यांच्या हस्ते राज्यस्तरीय विविध पुरस्कारांचे वितरण झाले त्यानंतर त्यांनी गेली लावून चुना या गाण्यावर नृत्य सादर करून व लावणी नृत्य करून रसिकांचे मनोरंजन केले .
या संमेलनात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील कवी, लेखक व साहित्यिक सहभागी झाले होते . साहित्याला व्यासपीठ देणारा हा साहित्य सोहळा साहित्यप्रेमींसाठी पर्वणी ठरला . साहित्यिक, कवी, वाचक रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते .असे आवाहन के. एस. आय. पब्लिकेशन, कोल्हापूर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे .

