कणकवली प्रतिनिधी गुरुनाथ तिरपणकर तेज न्यूज
कोकणच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे जतन व संवर्धन करणाऱ्या दशावतार या लोककलेच्या माध्यमातून जनजागृती करणाऱ्या महिला दशावतार संस्था सिंधुदुर्ग जिल्ह्यात कार्यरत आहेत,त्यातच कणकवली येथील सिंधुदुर्ग महिला दशावतार मंडळ अग्रेसर आहे.सिंधुरत्न महिला दशावतार मंडळाच्या सर्व महिला कलाकार व इतर सहकारी यांचा विशेष सत्कार करण्यात येईल असा शब्द मंडळाच्या अध्यक्षा अक्षता ताई कांबळी याना दिला होता.
त्याच अनुषंगाने त्यांच्या कलेचा गौरव म्हणून यथोचित सन्मान जनजागृती सेवा संस्था, बदलापूर यांच्यावतीने कणकवली येथील "सिंधुरत्न महिला दशावतार "नाट्य मंडळाच्या स्त्री आणि पुरुष कलाकारांचा भव्य सत्कार सोहळा येथील भवानी सभागृह, तेली आळी,ता.कणकवली येथे संम्पन्न झाला.सर्व प्रथम गणेश प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन व दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
यावेळी व्यासपीठावर जनजागृती सेवा संस्थेचे अध्यक्ष . गुरुनाथ तिरपणकर, संस्थेचे सल्लगार अरविंद सुर्वे, सिंधुरत्न महिला दशावतार मंडळाच्या अध्यक्षा व अभिनेत्री सौ. अक्षता कांबळी, लावण्यसिंधू लोककला व चित्रपट सहकारी संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर उपरकर, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. विठ्ठल गाड हे उपस्थित होते.
जनजागृती सेवा संस्था बदलापूर या संस्थेचे सामाजिक कार्य व विविध उत्सव, पत्रकारिता, शैक्षणिक उपक्रम, गरजूना वस्तू वाटप,अन्नदान, दिपावलीमध्ये फराळ वाटप, महिला दिन कार्यक्रम, ज्येष्ठ पत्रकारांचा व विविध वृत्तपत्र संपादकांचा सत्कार,शिक्षक दिन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, शिवजयंती असे अनेक उपक्रम गेली 5 वर्षे कोकणासह 6 जिल्हयामध्ये राबविण्यात येत असल्याची माहिती जनजागृती सेवा संस्थेचे अध्यक्ष श्री. गुरुनाथ तिरपणकर यांनी बोलताना दिली. ते म्हणाले, कोकणच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे जतन व संवर्धन करणाऱ्या "दशावतार" या लोककलेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात कार्यरत असलेल्या "सिंधुरत्न महिला दशावतार "कणकवलीच्या अध्यक्षा सौ. अक्षता कांबळी मंडळाचे येथील सर्वं स्त्री व पुरुष कलाकार, वाद्यवृंद, मेकअपमन, दिग्ददर्शक, लेखक यांचा शाल, श्रीफळ, गौरवपत्र, स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच कणकवलीतील स्वयंभु संस्थेचे अध्यक्ष व जेष्ठ साहित्यिक डॉ. विठ्ठल गाड, लावण्यसिंधू लोककला व चित्रपट सहकारी संस्थेचे अध्यक्ष श्री. चंद्रशेखर उपरकर, जनजागृती सेवा संस्थेचे सल्लागार श्री. अरविंद सुर्वे, श्री.अनिल कांबळी, सौ.गंधाली तिरपणकर यांचा सुद्धा हृद्य सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून बोलताना श्री. चंद्रशेखर उपरकर यांनी सांगितले की, जाणता राजा या महानाट्यातील सहकलाकारांना घेऊन आम्ही "शिवाई पर्यटन व कला - क्रिडा व साहित्य एकादमी " या संस्थेची स्थापना केली आणि त्याचवेळी या सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये प्रथमच महिला दशावतारी नाट्य प्रयोग सुरु केले.त्यावेळीपासून सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये पुरुषांच्या बरोबरीने विविध महिला मंडळे महिला दशावतार नाट्यप्रयोग सादर करू लागल्या ते लोकांनाही आवडू लागले याचा आम्हाला आनंद वाटतो. त्यांनतर दशावतारी कलाकार श्री.विनायक येरागी, सूर्यकांत गुरव, गोविंद लाड, गुरुनाथ मेस्त्री, दत्तात्रय मेस्त्री, गिरीश लिंग्रस, सौ. साक्षी आमडोस्कर, सौ.शिवानी विचारे,सौ. मयुरी सावंत यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
जनजागृती सेवा संस्थेच्या वतीने दशावतार नाटकात स्त्रीची भूमिका करणारे पुरुष कलाकार श्री. संतोष चाळके, रोहित राणे, परशुराम सांगवेकर, सुरेश गुरव, संजय लाड, सिंधुरत्न महिला दशावतार नाटकातील कलाकार सौ.साक्षी आमडोसकर,सौ. पूजा दळवी, सौ. मयुरी सावंत, सौ. शिवानी विचारे, कु. अर्चना करगनी, कु. आराध्या पुजारे, कु. गौरी परब, कु. मैथिली गावकर, कु. हर्षदा सुतार संगीत साथ देणारे श्री. दत्तात्रय मेस्त्री, श्री. अर्जुन कोरगावकर, भावेश सावंत, ओंकार मेस्त्री, सागर मेस्त्री, रामदास सामंत, गिरीश लिंग्रस, गणेश घाडी, सुंदर साटम, अजय सांगवेकर, प्रतीक मिठबावकर यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करून सत्कार करण्यात आला.शेवटी गुरुनाथ तिरपणकर यांनी संस्थेतर्फे सर्वांचे आभार मानले.

