पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी,पंढरपूर येथील यांत्रिकी अभियांत्रिकी विभागाच्या २०२६ बॅचमधील ०५ विद्यार्थ्यांची एक्सेल्सिस एनर्जी, पुणे येथे इंटर्नशिपसाठी निवड झाली आहे. या उल्लेखनीय यशामुळे महाविद्यालयाच्या उद्योगाभिमुख शिक्षणपद्धतीला आणि विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यांना आणखी एक यशस्वी दिशा मिळाली आहे.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये कु.जाब्बार हकीम, कु.नवनाथ शिंदे, कु.सत्यम थोरात,कु. वृशाली मोरे आणि कु.प्रगती माने यांचा समावेश आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना इंटर्नशिपदरम्यान दरमहा ₹१०,००० मानधन मिळणार आहे. तसेच इंटर्नशिप यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर कंपनीच्या निकषांनुसार वार्षिक ₹४ ते ₹४.५ लाख वेतनाच्या रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.
या इंटर्नशिपमुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष औद्योगिक वातावरणात काम करण्याचा अनुभव, तांत्रिक कौशल्यांचा प्रत्यक्ष वापर, व्यावसायिक कार्यपद्धतीची ओळख आणि भविष्यातील करिअरसाठी आवश्यक उद्योगाभिमुख अनुभव मिळणार आहे. शिक्षणासोबत प्रत्यक्ष औद्योगिक अनुभव मिळाल्याने विद्यार्थ्यांची उद्योगसज्जता, कौशल्यविकास आणि रोजगारक्षमता अधिक बळकट होण्यास मदत होणार आहे.
या यशामध्ये प्रशिक्षण व प्लेसमेंट अधिकारी डॉ. समीर कटेकर यांचे मार्गदर्शन व प्रयत्न महत्त्वपूर्ण ठरले. तसेच यांत्रिकी अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. श्याम कुलकर्णी, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी आणि प्राचार्य डॉ. कैलाश जगन्नाथ करांडे यांचे विद्यार्थ्यांना सातत्यपूर्ण मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय इंटर्नशिप निवडीबद्दल महाविद्यालय व यांत्रिकी अभियांत्रिकी विभागाच्या वतीने कु.जाब्बार हकीम, कु.नवनाथ शिंदे, कु. सत्यम थोरात,कु.वृशाली मोरे आणि कु.प्रगती माने यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले असून त्यांच्या पुढील औद्योगिक व व्यावसायिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
उद्योगाशी जोडलेले शिक्षण, कौशल्याधारित प्रशिक्षण आणि विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष करिअरच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या विभागाच्या प्रयत्नांचे हे यशस्वी उदाहरण ठरले आहे.

