अक्कलकोट व मंदीर परिसर कॉरिडोरसाठी शासनाकडून ५०० कोटींचा विकास आराखडा मंजूर करून घेतल्याबद्दल झाला आ.सचिन दादा कल्याणशेट्टी यांचा सत्कार.
अक्कलकोट प्रतिनिधी श्रीशैल गवंडी तेज न्यूज
येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान परिसर व अक्कलकोट कॉरिडोरसाठी शासनाकडून ५०० कोटींचा विकास आराखडा मंजूर करून घेतल्याबद्दल आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी यांच्या निवासस्थानी श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने चेअरमन महेश इंगळे यांच्या हस्ते आ.सचिन दादा कल्याणशेट्टी यांचा सत्कार करण्यात आला.
श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान परिसर व अक्कलकोट येथे भाविकांसाठी अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कॉरिडोर निर्मितीच्या पहिल्या टप्प्यासाठी ५०० कोटी रुपयांचा विकास आराखडा सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री कार्यालयातर्फे मिळाले आहेत. या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी यांचा वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने हा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन महेश मालक इंगळे यांच्या हस्ते आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी, व नगराध्यक्ष मिलन दादा कल्याणशेट्टी यांना शाल, श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.
यावेळी बोलताना आमदार सचिन दादा म्हणाले की स्वामी समर्थांच्या चरणी ही मोठी सेवा घडत आहे. कॉरिडोरमुळे देशभरातील लाखो भक्तांना चांगल्या सुविधा मिळतील. सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी पहिल्या टप्प्यासाठी ५०० कोटींचा आराखडा मागवला आहे. लवकरच निधी मंजूर करून कामाला सुरुवात होईल. देवस्थान, नगरपालिका आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने हे काम पूर्णत्वास नेऊ असे मनोगत व्यक्त केले. यावेळी चेअरमन महेश मालक इंगळे यांनी आमदारांच्या पाठपुराव्या बद्दल आभार मानले. सन्माननीय आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी यांच्या प्रयत्नातून आणि स्वामींच्या कृपेने अक्कलकोटचा विकास आणखी वेगाने होईल असा विश्वास यावेळी सर्व मान्यवरांनी व्यक्त केला.
या सत्कार सोहळ्यास श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे अध्यक्ष जन्मेजय महाराज भोसले, नगराध्यक्ष मिलन दादा कल्याणशेट्टी, उपनगराध्यक्ष बंटी राठोड, नगरसेवक तम्मा मामा शेळके, बाळा शिंदे, देविदास कवटगी, कांतू धनशेट्टी, नागराज कुंभार, महेश हिंडोळे, नन्नू कोरबू, प्रवीण शहा, सुनील सिद्धे, अपर्णाताई सिद्धे, अशोक जाधव, नावेद डांगे, नगरसेवक सद्दाम शेरीकर, नगरसेवक सचिन शिंदे आणि शिवू स्वामी, रमेश शिंदे सर व इतर नगरसेवक उपस्थित होते.

