मुंबई कांदिवली पश्चिम भारत कवितके
पंढरपूर येथे राष्ट्रीय समाज पक्षाचा युवा संकल्प मेळावा व नवीन पदाधिकारी यांची निवड करण्यात आली.राष्ट्रनायक महादेव जानकर यांच्या विचारांवर काम करणारे पंढरपूर चे रहिवासी असलेले ऍड.महाळाप्पा खांडेकर यांची जिल्हा संपर्कप्रमुख पदी निवड करण्यात आली.
यावेळी प्रदेश अध्यक्ष काशिनाथ नाना शेवते, महासचिव माऊली नाना सलगर, युवा प्रदेश अध्यक्ष अजित पाटील, अनिल दादा शेंडगे, आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रा.अनिल हेगडेकर (सोलापूर जिल्हा सचिव), अरुण चौगुले,( पंढरपूर तालुका अध्यक्ष), तात्याराव व्हनमाने (दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष), सचिन ओहाळ (सांगोला तालुका अध्यक्ष), विनोद नाईकनवरे ( मोहोळ तालुका संपर्क प्रमुख), दत्तात्रय काळे (युवक जिल्हाध्यक्ष सोलापूर), वैभव उर्फ नामदेव काशिद (युवक जिल्हाध्यक्ष सोलापूर), गणेश माडकर (युवक जिल्हा उपाध्यक्ष सोलापूर), विशाल भालेराव (बार्शी युवक तालुकाध्यक्ष), अविनाश नाईकनवरे (माढा युवक तालुकाध्यक्ष,)सागर दडस (करमाळा युवक तालुकाध्यक्ष), रघुनाथ पवार (मोहोळ युवक तालुकाध्यक्ष),उजना पवार ( पंढरपूर तालुका अध्यक्ष),धीरज तळे(करमाळा युवक तालुका संपर्क प्रमुख), लखन साळुंखे ( मंगळवेढा तालुका उपाध्यक्ष)या नवीन पदाधिकारी यांची निवड करण्यात आली.
पक्षाची ध्येयधोरणे जनमानसात पोहचवून संघटना अधिक बळकट करण्यासाठी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.मूळचे पंढरपूर चे रहिवासी असलेले आमचे मुंबई प्रतिनिधी भारत कवितके यांनी सर्वांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

