संग्रामनगर प्रतिनिधी केदार लोहकरे तेज न्यूज
अकलुजची ग्रामदेवता श्री. अकलाई देवीचा भंडारा (यात्रा) मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यात्रेनिमत्ताने अकलुजचा परीसरातील देवीभक्तांनी दिवसभर अकलाई देवीच्या दर्शनासाठी मंदिरात गर्दी केली होती.
अकलुजचे ग्रामदैवता श्री.अकलाई देवी देवस्थान ट्रस्ट वतीने आषाढी पौर्णिमेनंतर येणारा पहिला मंगळवार किंवा शुक्रवारी अकलाई देवीचा भंडारा (यात्रा) साजरा करण्याची प्रथा असुन काल बुधवारी पोर्णीमेनंतरच्या आज पहिल्या शुक्रवारी अकलाई देवीच्या भंडा-याचे आयोजन करण्यात आले होते.पहाटे अकलाई देवीची महापूजा देवस्थान व गुरव परीवाराच्यावतीने करण्यात आली.महापुजेनंतर देवीभक्तांचा दर्शनास प्रारंभ झाला.
महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील,बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते-पाटील,माजी सरपंच किशोरसिंह माने-पाटील यांच्यासह मोहिते-पाटील, माने-पाटील,माने-देशमुख कुटुंबीय व अकलुज परीसरातील देवीभक्तांनी अकलाई देवीचे दर्शन घेतले.दुपारी ११ वाजता देवीच्या पालखीचे मानकरी फुले परिवार वाड्यातुन देवीच्या पालखी मिरवणूकीस प्रारंभ झाला.मिरवणुकीत गोंधळी, आराधी,पोतराजासह फुले कुटुंब, देवीभक्त सहभागी झाले होते. रामायण चौक,अकलाई काॅर्नर मार्गे पालखी अकलाई म़दिरात आल्यावर मंदिर समितीचे मुख्य विश्वस्त जयसिंह मोहिते-पाटील व सुलक्षणादेवी मोहिते-पाटील यांनी पालखीचे स्वागत करुन दुपारची दहिभात महापुजा व आरती केली.दु. १२ ते २ या वेळेत खास महिला बरोबरच वयोवृद्ध व लेकुरवाळ्या मातांसाठी देवी दर्शनाची सोय करण्यात आली होती.दिवसभर मंदिर परिसरात देवी भक्तांनी देवीच्या दर्शनासाठी गर्दी केली होती.दर्शनास आलेल्या भाविकांना मंदीर समीतीच्यवतीने शिरा व खीरीच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले.
देवी भक्तांच्या दर्शनासाठी विविध सामाजिक, संघटना,सेवा भावी संस्था, सहकारी व शैक्षणिक संस्थाचे पदाधिकारी,अकलुज नगरपरिषदेचे कर्मचारी वर्गाने चोख व्यवस्था केली.सायंकाळी माजी जि.प.सदस्या स्वरुपाराणी मोहिते पाटील यांच्या हस्ते दिपमाळा प्रज्वलित करण्यात आली.
उद्या शनिवारी दुपारी २ वा.अकलुज शहरातुन देवीच्या छबिन्याची सवाद्यात ग्राम प्रदक्षिणा काढण्यात येणार असल्याचे मंदीर समितीच्यावतीने भाविकांन कळविले आहे.

