पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते 'लोकसाहित्य' साप्ताहिकाच्या विशेषांकाचे प्रकाशन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
या प्रकाशन सोहळ्यात सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, राष्ट्रवादी उद्योग व व्यापारी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, साहित्यप्रेमी आणि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी अल्पावधीत 'लोकसाहित्य' साप्ताहिकाने साहित्य, सामाजिक प्रश्न आणि सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी केलेल्या कार्याचे कौतुक केले. समाजातील विविध विषयांवर दर्जेदार लेखन व लोकसाहित्याचा प्रचार-प्रसार करण्यामध्ये या विशेषांकाचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
विशेषांकाच्या प्रकाशनानंतर उपस्थितांनी संपादक मंडळाचे अभिनंदन करत भविष्यातही अशाच दर्जेदार साहित्यकृती प्रकाशित करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. हा प्रकाशन सोहळा उत्साहपूर्ण आणि साहित्यप्रेमींसाठी प्रेरणादायी वातावरणात पार पडला.

