भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
श्री उत्कर्ष सार्व. वाचनालय, भाळवणी येथे विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजविणे आणि लेखनाची आवड निर्माण करण्याच्या उद्देशाने लेखन-वाचन प्रेरणा दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध पुस्तके वाचून त्यावरील मनोगते व्यक्त केली. तसेच लेखन स्पर्धा, प्रेरणादायी विचारांचे वाचन आणि पुस्तकांच्या महत्त्वाविषयी मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी नियमित वाचनामुळे ज्ञानात भर पडते, विचारशक्ती विकसित होते आणि व्यक्तिमत्त्व घडण्यास मोठी मदत होते, असे प्रतिपादन केले.
यावेळी माजी सरपंच राजू पाटील, चंद्रभागा साखर कारखान्याचे संचालक सुनील पाटील, सामाजिक कार्यकर्ते गोरख लिंगे, मा. सरपंच धोंडीराम शिंदे, मा. उपसरपंच अंबादास कुचेकर,श्रीयश गाजरे, गायकवाड, आदि मान्यवर उपस्थित होते.तसेच येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. व त्यांच्या ग्रंथाचे प्रदर्शन करण्यात आले एक ऑगस्ट हा शासनाने लेखन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात आला
यावेळी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत वाचनाची सवय जोपासण्याचा संकल्प केला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी वाचनालयाचे पदाधिकारी, शिक्षक, पालक आणि ग्रामस्थ यांनी सहकार्य केले.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आभार डॉ.धन्यकुमार गाजरे मानून लेखन-वाचनाची चळवळ अधिक व्यापक करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

