भाळवणी (ता. पंढरपूर) प्रतिनिधी तेज न्यूज
माढा–पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजित आबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भाळवणी येथे अभिजित आबा पाटील मित्र परिवाराच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये वृक्षारोपण, निराधार महिलांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप तसेच विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून वाढदिवस समाजोपयोगी पद्धतीने साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाला सेवानिवृत्त शिक्षक इ. बा. मुलाणी, शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे, उपसरपंच नितीन शिंदे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षा राजश्री ताड, माजी उपसरपंच हरिभाऊ लिंगे, सेवानिवृत्त तलाठी धोंडीराम शिंदे, ग्रामपंचायत सदस्य पोपट इंगोले, नागेश पाटील, संजय बाबर, भोजलिंग बाबर, नामदेव माने चौगुले, लुकमान इनामदार, सद्दाम सय्यद, मुन्ना इनामदार, राजाभाऊ ताड, शिवाजी ताड,सलीम तांबोळी, महंमद तांबोळी, राजू कुचेकर, संजय मोहिते, सातपुते, हरि बुरांडे, प्रशांत माळवदे, शेख, मुख्याध्यापक सुरेश शिंदे, गायकवाड, शिक्षक, विद्यार्थी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार अभिजित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या सामाजिक उपक्रमांचे उपस्थितांनी कौतुक केले. समाजसेवेचा संदेश देणाऱ्या अशा उपक्रमांमुळे वाढदिवसाला वेगळे सामाजिक स्वरूप प्राप्त झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.


