पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
गृह विभागाने अलीकडेच पंढरपूर साठी स्वतंत्र अप्पर पोलिस अधीक्षक कार्यालयासह आवश्यक मनुष्यबळ मंजूर केले आहे. या कार्यालयाच्या पहिल्या अप्पर पोलिस अधीक्षक पदी प्रेरणा कट्टे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पंढरपूर सह सांगोला, मंगळवेढा आणि माळशिरस या तालुक्यांसाठी स्वतंत्र अप्पर पोलिस अधीक्षक कार्यालयाला मंजुरी मिळाली आहे.नव्याने मंजूर झालेल्या कार्यालयाची जबाबदारी प्रेरणा कट्टे सांभाळणार आहेत.
महाराष्ट्र पोलिस दलातील अभ्यासू व अनुभवी अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे.महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून पोलिस उपअधीक्षक म्हणून त्यांनी सेवेत प्रवेश केला.नाशिक, मुंबई, सातारा, कोल्हापूर आणि पिंपरी-चिंचवड आदी ठिकाणी त्यांनी विविध पदांवर यशस्वीपणे काम केले आहे.

