सांगोला प्रतिनिधी तेज न्यूज
सांगोला तालुक्यातील मौजे कमलापूर येथील आकाश हॉटेल अँड लॉजिंगवर पोलिसांनी छापा टाकून देहविक्रीचा प्रकार उघडकीस आणला. पोलिसांनी हॉटेल मालकासह नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिस उपनिरीक्षक स्नेहल चव्हाण यांच्या फिर्यादीनुसार, हॉटेल मालक अविनाश विष्णू येडगे, कामगार चंद्रकांत भीमराव मोटे तसेच ग्राहक म्हणून आलेले शुभम उत्तम ढोबळे, अमोल गौतम ढोबळे, आसिफ बशीर मुलाणी, आशिष मारुती बनसोडे, प्रतीक नाथा बनसोडे, अब्दुल रफीक खातीक आणि निलेश सोमा कांबळे यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे.
पोलिस निरीक्षक राहुल देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने कमलापूर परिसरातील हॉटेल आकाश अँड लॉजिंग येथे बनावट ग्राहक पाठवून खात्री केली. त्यानंतर रात्रीच्या सुमारास हॉटेलवर छापा टाकण्यात आला.
छाप्यादरम्यान हॉटेलच्या मागील बाजूस असलेल्या जिन्याने पोलिस पथक वरच्या मजल्यावर गेले. त्यावेळी एका खोलीत संशयास्पद परिस्थितीत एक महिला व तिच्यासोबत पोलिसांनी पाठविलेला बनावट ग्राहक आढळून आला. चौकशी केली असता सदर हॉटेलमध्ये देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
या कारवाईत हॉटेल मालकासह संबंधित व्यक्तींविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. सदर ची कार्यवाही सहायक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली निर्भया पथक पंढरपूर विभाग प्रमुख महिला पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया यादव,पोलीस कॉन्स्टेबल शशिकांत सावंत .लक्ष्मण कुचेकर. पांडुरंग टिंगरे .निर्मला वाघमारे .शाहीन काझी. यांची आहे यामध्ये मदत सांगोला पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे, उपनिरीक्षक संदीप गुरव आणि त्यांची टीम यांनी केली आहे.
पोलिसांच्या या कारवाईमुळे कमलापूर परिसरात खळबळ उडाली असून, हॉटेल व लॉजिंग व्यवसायाच्या नावाखाली सुरू असलेल्या गैरप्रकारांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.

