पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील स्थापत्य अभियांत्रिकी विभागाच्या सोळा विद्यार्थ्यांची तांदुळवाडी येथील सायली बिरा बंडगर, गुरसाळे येथील धिरज पांडुरंग घाटे, अभिषेक साहेबराव घाटुळ, कलढोण, ता.खटाव येथील तेजस्वी यशवंत खांडेकर, सोनके, ता.पंढरपूर रोहन राजेंद्र बाबर, उस्मानाबाद येथील श्रेयस कैलास परचंडे, पंढरपूर येथील ज्ञानेश्वरी महेश खरात, ज्ञानेश्वरी अशोक दरमोडे, आरती मारुती गोसावी, बंडगरवाडी, ता.सांगोला येथील स्वाती मारुती हाके, बोरगांव, ता.करमाळा येथील वैष्णवी जितेंद्र नागणे, कोर्टी, सांगोला येथील स्वप्नाली बाळासो कतारे, वरकुटे माळवाडी, ता.माण येथील साक्षी अजयकुमार बाबर, तारापूर, ता.पंढरपूर येथील अनिल दत्तात्रय चच्हाण, मुंबई येथील गणेश ज्ञानेश्वर जाधव, कोर्टी, ता.पंढरपूर अजय राजाराम वाघमारे या विद्यार्थ्यांची जीसोर्स टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये निवड कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे विभागप्रमुख डॉ. यशवंत पवार यांनी दिली.
ही कंपनी इंजिनिअरिंग डिझाइन, तंत्रज्ञान आणि आउटसोर्सिंग सेवा देणारी कंपनी आहे. अभियांत्रिकी डिझाइन, कॅड/बीम संबंधित कामे, स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग आणि तांत्रिक सेवा इ. क्षेत्राात कंपनी प्रामुख्याने काम करते.
अशा या कंपनीत वरील विदयार्थ्यांची कॅम्पस मुलाखतीतून निवड झाल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, डॉ. चेतन पिसे, डॉ. भालचंद्र गोडबोले, डॉ. श्याम कुलकर्णी, डॉ. श्रीगणेश कदम, डॉ. संपत देशमुख, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. अतुल आराध्ये, डॉ. सोमनाथ कोळी, डॉ. सुभाष पिंगळे, डॉ.अनिल निकम, डॉ. शिवशंकर कोंडूरु, डॉ. यशवंत पवार, डॉ. सत्यवान जगदाळे, प्रा. अमोल कांबळे आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

