सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
राणी कित्तूर चेन्नम्मा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची), सोलापूर येथे पेंटर जनरल या व्यवसायाच्या विद्यार्थिनींचा निरोप समारंभ मोठ्या उत्साहात, भावनिक व आनंदाच्या वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थिनींना OJT (On the Job Training) प्रमाणपत्रांचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले, त्यामुळे विद्यार्थिनींमध्ये विशेष आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला निवनियुक्त प्राचार्या इंदिरा रणभिडकर मॅडम आणि कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले मंत्री महोदयांचे स्वीय सहाय्यक मा. संतोष गायकवाड साहेब यांचा सत्कार करण्यात आला . कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राचार्या इंदिरा रनभिडकर मॅडम यांच्या हस्ते विद्यार्थींनींना OJT प्रमाणपत्र वाटप करण्यात आले . प्राचार्य मॅडम यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात विद्यार्थिनींना OJT चे महत्त्व विशद करून सांगितले. प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी मिळणारा अनुभव, तांत्रिक कौशल्ये आत्मसात करण्याची संधी आणि औद्योगिक क्षेत्रातील शिस्त व जबाबदारीची जाणीव या सर्व बाबी भविष्यातील करिअर घडवण्यासाठी किती मोलाच्या ठरतात, याबाबत त्यांनी विस्ताराने विवेचन केले. तसेच पेन्टर जनरल बॅच ला १००% शिकाऊ उमेदवारी मिळाल्याबद्दल विद्यार्थीं आणि निदेशकांचे कौतूक केले व पुढे टाटा मोर्टर्स पुणे , पियाजो प्रा. लि. बारामती आणि माजगाव डॉक मुंबई येथे जाणाऱ्या विद्यार्थिनींचा आत्मविश्वास वाढवत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .
पेन्टर निदेशक श्री विवेक चंदालिया सर यांनी विद्यार्थींनींना संस्थेने दिलेल्या प्रशिक्षणाचा उपयोग समाजासाठी व स्वतःच्या उन्नतीसाठी करावा, असा सल्ला दिला व विद्यार्थिनींना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देत, संस्थेतील शिस्त , संस्कार व मेहनतीचे स्मरण करून दिले. यावेळी स्वीय सहाय्यक तथा सोलापूर जिल्हा समन्वयक संतोष गायकवाड साहेब , प्रशांत सुतार सर,तात्यासाहेब तांबे सर दोन्ही बॅचमधील सर्व विद्यार्थिनी या समारंभास मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित सर्वांनी आपले मनोगत व्यक्त केले. विद्यार्थिनींनी संस्थेतील शिक्षण काळातील आठवणींना उजाळा देत, शिक्षकांचे मार्गदर्शन, संस्थेने दिलेले संस्कार आणि प्रशिक्षण काळात मिळालेल्या अनुभवांबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त केली. अनेक विद्यार्थिनींच्या डोळ्यांत आनंद आणि निरोपाचे भावुक क्षण एकाच वेळी दिसून आले. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थिनींना त्यांच्या पुढील शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


