सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
सोलापूर जिल्हा ग्रंथालय आधिकारी कार्यालय प्रमुख म्हणून प्रमोद पाटील यांची प्रभारी नियुक्ती झाल्याबद्दल पंढरपूर ग्रंथालय संघ विभागाच्या वतीने स्वागत पर सत्कार करण्यात आला. सोलापूरचे तत्कालीन जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे यांच्याकडे प्रभारी जिल्हा ग्रंथालय अधिकारी सोलापूर कार्यालयाचा ज्यादा पदभार होता . सुनील हुसे यांची संभाजीनगर येथे सहाय्यक ग्रंथालय संचालक म्हणून पदोन्नती झाल्यामुळे त्यांच्या या रिक्त जागेवर प्रभारी म्हणून कामाची अचूक जाण असलेले प्रमोद पाटील यांची वरिष्ठ पातळीवरून नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रमोद पाटील हे सोलापूर जिल्हा ग्रंथालय आधिकारी कार्यालयात गेली आठ वर्ष तांत्रिक सहाय्यक या पदावर सोलापूर जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी व जिल्ह्यातील ग्रंथालय चळवळीतील पदाधिकारी यांच्या समवेत मिळून मिसळून काम करण्याचा त्यांचा हातखंड होता सोलापूर जिल्ह्यातील प्रतीक तालुक्यातील ग्रंथालय कर्मचारी पदाधिकारी यांना नेहमी कार्यालयीन कामकाजाबाबत मार्गदर्शन करीत असत त्यांच्या या कार्य कौशल्यामुळे ग्रंथालय कामकाजाचा मोठा अनुभव असल्यामुळे त्यांची सोलापूर ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या प्रमुखपदी नव्याने नियुक्ती झाल्याबद्दल पंढरपूर ग्रंथालय संघाच्या वतीने सोलापूर ग्रंथालय संघाचे अध्यक्ष ज्योतीराम गायकवाड यांच्या शुभहस्ते शाल, फेटा श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना नूतन जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्रमोद पाटील म्हणाले की सोलापूर जिल्हा ग्रंथालय कार्यालयातील आज पर्यंतचा अनुभव याचा फायदा निश्चितच जिल्ह्यातील ग्रंथालयीन प्रश्न व अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ग्रंथालय कार्यालयात नुकतेच रुजू झालेले लिपिक हिरालाल पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक तानाजी जाधव, सोलापूर जिल्हा राष्ट्रवादीचे काँग्रेसचे माजी कार्याध्यक्ष दिलीप भोसले, सोलापूर ग्रंथालय संघाचे माजी सरचिटणीस अन्सार शेख, श्रीकृष्ण सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष प्रशांत जाधव ,मच्छिंद्र लेंडवे सर , लक्ष्मण कोल्हे, विनायक गुरव, रवी गाजरे, बाळासाहेब साळुंखे, महेश पवार, बाळासाहेब शिंदे ,संजय चव्हाण, अतुल मोरे, बापू फाटे, पंढरपूर नगर वाचनालयाचे ग्रंथपाल प्रवीण पाटक, बिभीषन साळुंखे, रामदास नागटिळक, हनुमंत शिंदे, डॉ. हरि भोसले इत्यादी ग्रंथालय संघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

