भारत कवितके प्रतिनिधी मुंबई कांदिवली पश्चिम तेज न्यूज
नातेपुते येथे माऊलींच्या पालखीचे मोठ्या उत्साहात आगमन झाले.रविवार दिनांक १९ जुलै २०२६ रोजी नातेपुते येथे माऊलींच्या पालखीचे आगमन होताच भक्तीभावाने पुरुष व महिला यांनी पालखीचे दर्शन घेतले.टाळ मृदंगाच्या आवाज अभंग, गौळण, भारुड गाऊन वारकरी तल्लीन होऊन जात होते.
अनेक लहान मोठ्या पालख्या सकाळ पासूनच बरड वरुन नातेपुते कडे धाव घेत होत्या,तर नातेपुते येथील पुरुष व महिला पालखी दर्शनासाठी नातेपुते हून पालखी कडे धाव घेताना दिसत होते.तर आमचे मुंबई प्रतिनिधी भारत कवितके यांनी या पालखी सोहळा पाहत बातमी संकलित केली.
यावेळी नातेपुते येथील मुख्य रस्त्याच्या बाजूला बस स्थानकाजवळ महाराष्ट्र राज्य शासन मुख्यमंत्री साहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय कक्ष आम्ही सेवेकरी माऊलीचे या योजने अंतर्गत नातेपुते येथील अनेक शाळा कॉलेज चे विद्यार्थी विद्यार्थीनी वारकरी यांची चरण सेवा करताना दिसत होते,व त्यांना त्यांचे शिक्षक मार्गदर्शन करीत होते,
एकंदरीत नातेपुते येथील पालखी आगमनाने संपूर्ण गावाचे वातावरण भक्तिमय झाल्याचे दिसून येत होते.शनिवार पालखी मुक्काम नातेपुते येथे असणार आहे,व सोमवारी सकाळी पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे.

