पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी पंढरपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या 'सद्बुद्धी दिंडी' आंदोलनात सहभागी होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा आमदार जयंत पाटील पंढरपुरात आले असता त्यांनी पक्षाचे उद्योग व व्यापारी विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांच्या पंढरपूर येथील संपर्क कार्यालयाला सदिच्छा भेट दिली.
याप्रसंगी ॲड. पांडुरंग चौरे महाराज,भास्कर गायकवाड, संग्राम कापसे, डाॅ.रमेश फाटे उमेश फाटे, शुभम फाटे,शर्विन फाटे , शशांक फाटे, विनय शिंदे,निवृत्ती पाटील, संतोष पुणेकर, सुमित बागल, समाधान कांबळे,तेजस देवकते,शरद थिटे,सुरेश बागल, वसीम मुलाणी, मोरेश्वर उपळकर, श्रीधर पिसे उपस्थित होते.या भेटीदरम्यान पक्ष संघटना, व्यापारी आघाडीचे काम आणि आगामी राजकीय घडामोडींवर चर्चा झाली.
यावेळी आमदार जयंत पाटील यांनी नागेश फाटे यांनी पक्ष संघटना बळकट करण्यासाठी केलेल्या कार्याचे विशेष कौतुक केले. उद्योग व व्यापार विभागाच्या माध्यमातून राज्यभर व्यापारी, उद्योजक आणि विविध घटकांना पक्षाशी जोडण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न उल्लेखनीय असल्याचे सांगत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. नागेश फाटे यांनी पक्षातील महत्त्वाच्या पदावर पाच वर्षाचा कार्यकाल पूर्ण केला आहे. याबाबत त्यांनी पक्षश्रेष्ठींना थोडक्यात पक्षकार्याची माहिती दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर अनेक नेत्यांनी वेगवेगळे राजकीय निर्णय घेतले. मात्र, नागेश फाटे यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यावरील निष्ठा कायम ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात सक्रियपणे काम सुरू ठेवले. उद्योग व व्यापार विभागाच्या माध्यमातून राज्यभर संघटनात्मक बांधणीसाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले असून त्यांच्या कार्याची पक्षश्रेष्ठींनी दखल घेत त्यांची सातारा जिल्ह्याचे पक्षनिरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.
या भेटीदरम्यान उपस्थित पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना जयंत पाटील यांनी संघटन अधिक मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी जनतेमध्ये जाऊन पक्षाची भूमिका प्रभावीपणे मांडावी, असे आवाहन केले. तसेच आगामी काळात पक्ष संघटना अधिक सक्षम करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
सद्बुद्धी दिंडी आंदोलनाच्या निमित्ताने झालेल्या या सदिच्छा भेटीमुळे पंढरपूरातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, पक्षाच्या संघटनात्मक बळकटीसाठी ही भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

