पुणे प्रतिनिधी अमोल सहारे तेज न्यूज
जगद्गुरू संत तुकाराम महाराज संस्थान वतीने महाराष्ट्र राज्यातील एकमेव अग्रगण्य पद्य महापुजेचा मान विश्वगुरु सन्मानित ह.भ.प. नामदेव महाराज हरड श्रीकाशी विद्वत परिषद प्रभारी वाराणसी यांना मान मिळाला, यावेळी उपस्थित महापुजेसाठी ह.भ.प. मयुरानंद महाराज ह.भ.प. समृद्धी भांडे, संत तुकाराम महाराज संस्थान मा. अध्यक्ष अध्यक्ष ह.भ.प. पुरुषोत्तम् महाराज मोरे. संत तुकाराम महाराज वंशज व विश्वस्त ह.भ.प. माणिक महाराज मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
देशातील लाखो वारकऱ्यांच्या उपस्थित महापुजा, महाआरतीचा सोहळा पार पडला. विश्वगुरु सन्मानित नामदेव महाराज हरड हे विश्वख्यात असुन ते काशी विद्वत परिषदेचे प्रभारी आहेत. आगामी २०२७ सिंहस्थ कुंभमेळा अमृत स्नान महापर्वणी निमित्त त्र्यंबकेश्वर नाशिक येथे विश्वातील सर्वात मोठे व्यासपीठ निर्माते आहेत. यावेळी देशातील येणाऱ्या कुंभमेळयात येणाऱ्या तपस्वी साधु-संत आध्यात्मिक गुरूजनांचे १०८ संतांचे महापुजन करण्यात येणार आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्यात उपस्थित हजारो भाविकांना महाप्रसाद भोजन व राहण्याची व्यवस्था विश्वगुरु सन्मानित नामदेव महाराज हरड यांच्या वतीने करणार आहेत. सिंहस्थ कुंभमेळ्यात उपस्थित राहुन पुण्यासह देशातील तमाम संत सजनांनी अवश्य लाभ घ्यावा असे आव्हाहन महापुजे वेळी करण्यात आले आहे.
जगद्गुरू संत तुकाराम महाराज संस्थान व देहूकरांनी अग्रगण्य महापुजेचा मान दिल्याबद्दल देहु संस्थानाचे मनापासून ऋणी असल्याचे मत नामदेव महाराज हरड यांना व्यक्त केले.

