भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम प्रतिनिधी तेज न्यूज
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने एनसीएमसी कार्ड अमंलबजावणी १ आगस्ट २०२६ पासून करण्यात येईल असे राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जाहीर केले आहे, या बाबत ही मुदत आणखी वाढवून देण्यात यावी, अशी मागणी मुंबई कांदिवली पश्चिम येथील पत्रकार साहित्यिक गीतकार सामाजिक कार्यकर्ते भारत कवितके यांनी केली आहे.
परंतु या कार्ड काढते वेळी येणाऱ्या अडचणी ही खूप आहेत,कार्ड काढते वेळी सर्व्हर चा व्यत्यय येतो, मोबाईल वर ओटिपी लवकर येत नाही, तर कधी कधी मशिन वर अंगठा किंवा बोट वारंवार ठेवून सुद्धा, अंगठा किंवा बोट पाण्याने धुवून स्वच्छ करून घेतला तरी स्विकारला जात नाही,मिळणारी पावती व त्या वरील अक्षर स्पष्ट दिसत नाहीत, एक महिना नंतर कार्ड आणण्यासाठी गेले असता पावती जीर्ण होऊन त्यावरील अक्षरे मिटून गेलेली असतात, काही बस स्थानकावर शेड नसल्याने ऊना पावसात महिला व जेष्ठ नागरिक यांना तासनतास रांगेत उभे राहावे लागते,त्यांची कार्ड साठी चाललेली केविलवाणी धडपड पाहवत नाही, त्या मोबाईल नसलेल्या, अशिक्षित असलेल्या ज्येष्ठांना व महिलांना या बाबत काहीच लक्षात येत नाही, त्या मुळे कार्ड बनविणाऱ्याचे व त्यांचे वाद विवाद वाढत जातात.
आमचे मुंबई प्रतिनिधी भारत कवितके यांनी रांगेत उभे असलेल्या जेष्ठ नागरिक व महिला यांची मुलाखत घेतली तेव्हा या कार्ड बाबत अनेकांनी सांगितले की," आधार कार्ड वर जन्म तारखेची नोंद आहे,ते आधार कार्ड शासनमान्य असून शासनाने दिले आहे, त्या वर अविश्वास कसा असू शकतो? यापेक्षा बस स्थानकावर असलेली शेड, पंखे, शौचालय,दारुडे, गर्दुल्ले, भिकारी, आवारातील डांबरी करण यामध्ये काही सुधारणा करून प्रवाशांना होणारा त्रास कमी करावा.
हे कार्ड अजून सोप्या पद्धतीने कसे मिळेल? यांचा विचार महामंडळाने करावा,हे कार्ड पोस्टाने घरपोच मिळावे, अशी सोय महामंडळाने करावी.पहाटे ४, ५वाजलेपासून जेष्ठ नागरिक व महिला यांना या कार्ड साठी ताटकळत उभे राहावे लागते आहे.यांची मुदत १ आगस्ट असल्याने जेष्ठ नागरिक व महिला हे कार्ड काढण्यासाठी गर्दी करताना दिसतात.

