शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या मिरवणूकीस समस्त कोष्टी समाज बांधव,महिला आणि करकंब ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
करकंब प्रतिनिधी ज्ञानेश्वर दुधाणे तेज न्यूज
श्री चौंडेश्वरी मंदिर कोष्टी समाज ट्रस्टी नारायण वास्ते आणि प्रभाकर टेके यांच्या मार्गदर्शनाखाली आणि समस्त कोष्टी समाज बांधवांच्या सहयोगातून शेकडो वर्षांची परंपरा असलेला दोन दिवशीय भावई उत्सव उत्साहात साजरा झाला.
पहिल्या दिवशी आई चौंडेश्वरी मातेला महिम्न अभिषेकाने सुरुवात झाली.त्यानंतर भारत वास्ते, लक्ष्मण वास्ते परिवाराच्या वतीने सुवासिनी पूजन आणि समस्त समाजबांधवांना महाप्रसाद संपन्न झाला.त्याचवेळी मानसी ओगले हिचा सी.ए.पदवी प्राप्त केल्या बद्दल करकंब कोष्टी समाज बांधवांच्या वतीने सह्रदय सत्कार करण्यात आला,दुसऱ्या दिवशी करकंंब ग्रामस्थांना उत्सुकता असलेल्या शेकडो वर्षांची परंपरा असलेला भावई उत्सवाच्या मिरवणूकीला सुरुवात झाली.
श्री चौंडेश्वरी मंदिरात अनेक तरुणांनी भावई खेळत खेळत, ज्ञानेश्वर दुधाणे, राजकुमार दुधाणे,अनंत टकले,सुभाष भरते,विष्णू मुखरे सोमनाथ नरखेडकर, प्रभाकर टेके, संजीवकुमार म्हेत्रे, चंद्रकांत फासे, भास्कर करपे,हणुमंत सांगोलकर, टेके परिवार,गोविंद वेळापूरकर, वसंत बुगड, या मानकऱ्यांच्या घरी आई चौंडेश्वरी मातेच स्वागत आणि मनोभावे पूजा संपन्न होत.
सोमवार पेठ,मोती चौक, मेन रोड, म्हसोबा, शुक्रवार पेठ,या मार्गावरून शेवटी दिलीप शिंदे (परीट)यांचे घरी शेवटची पूजा करत भावई चौंडेश्वरी मंदिरात विसावली.तिथे श्री चंद्रकांत रसाळ आणि सतीश दुधाणे सौ.वंदना दुधाणे यांचे शुभहस्ते आरती करून आणि ज्यांनी ज्यांनी प्रतिवर्षाप्रमाणे आपली सेवा बजावली त्यांचा आई चौंडेश्वरी मातेचा प्रसाद देऊन सत्कार करण्यात आला.त्यानंतर सर्व तरुणांच्या वतीने महाप्रसाद देऊन दोनदिवशीय उत्सव अगदी उत्साहाने संपन्न झाला.
हा उत्सव यशस्वीपणे संपन्न करण्यासाठी भावई उत्सव समिती चंद्रकांत रसाळ,राजेंद्र टकले, राजेंद्र नडे,अभिजित टेके,जयंत टकले,,सतीश दुधाणे, बाळकृष्ण टेके, राजेंद्र करपे, गणेश वास्ते, शिवाजी टकले, मयुरेश म्हेत्रे, तुकाराम मुखरे,कन्हैया टेके, शंभू फासे,दिलीप परीट,धीरज वास्ते, प्रभाकर टकले,हरिश्चंद्र वास्ते,आशिष इदते,ज्ञानेश्वर दुधाणे, नवनाथ टकले, नितीन टकले,संजय दुधाणे, नवनाथ वास्ते, संतोष पिंपळे,भुषण वास्ते, राहुल शिलवंत,माऊली मुखरे, सोमनाथ टकले,वल्लभ शिलवंत,कुरवली दिलीप टकले,शेखर सांगोलकर,किरण गुरसाळे, गणेश टकले,आकाश नडे, संतोष ढवळशंख,विवेक करपे, हेमंत टकले,राजू टेके,विक्रम म्हेत्रे,अथर्व म्हेत्रे,ओंकार मुखरे,प्रतिक टेके, अभिजित वास्ते,धोंडीराम भाजीभाकरे,तुषार कवडे,सोहम टकले, महेश टकले,समस्त करकंब कोष्टी समाज बांधवांच्या वतीने अधिक परिश्रम घेतले.शेवटी ज्ञानेश्वर दुधाणे यांनी समस्त कोष्टी समाज बांधवांचे आभार मानले.

