पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर शहर पोलीस ठाणे हददीतील सराईत वाळु तस्कर गुन्हेगार जानुकाका उर्फ जालिंदर मोहन कंडरे रा. कंडरे चौक, पंढरपुर ता. पंढरपुर जि. सोलापुर यांचेविरूध्द वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे पंढरपुर शहर पोलीस ठाणे यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६(१)(ब) प्रमाणे तडीपारीचा प्रस्ताव तयार करून हददपारीचे कारवाईबाबत उपविभागीय दंडाधिकारी सचिन इथापे यांना अहवाल सादर केला होता.
त्याबाबत सहा. पोलीस अधिक्षक प्रशांत यांनी सदर हददपार करणेच्या संदर्भातील काम चालवुन सदरबाबतचा सविस्तर अहवाल उपविभागीय दंडाधिकारी सचिन इथापे यांचेकडे सादर केला होता. त्या अनुशंगाने वाळु तस्कर जानुकाका उर्फ जालिंदर मोहन कंडरे रा. कंडरे चौक, पंढरपुर ता. पंढरपुर जि. सोलापुर यास ०२ वर्षे कालावधीकरीता संपुर्ण सोलापूर जिल्हयातुन हददपार करण्यात आले असून सदरची नोटीस ही हददपार इसम यांना ताब्यात घेवून बजावण्यात आली आहे. तसेच पंढरपुर शहरातील इतर सराईत गुन्हेगारांवर कठोर परिणामकारक प्रतिबंधक कारवाई करणेचे कामकाज सुरू आहे.
सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, सहाय्यक पोलीस अधिक्षक प्रशांत डगळे, पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोसई नितीन जगताप, सपोफौ कल्याण ढवणे, पोलीस नाईक सचिन इंगळे, तसेच स्थानिक गुन्हे शाखा, सोलापुर ग्रामीणचे अनिस शेख व सायबर सेलचे रतन जाधव यांनी केली आहे.


