स्विमींग ग्रुप परिवाराकडून आदर्श शिक्षक कल्याणी गंगोडा यांचा वाढदिवस साजरा
वाढदिवसानिमीत्त कल्याणी गंगोडा यांचा महेश इंगळे यांच्या हस्ते सत्कार.
अक्कलकोट प्रतिनिधी श्रीशैल गवंडी तेज न्यूज
अक्कलकोट तालुक्यातील आदर्श शिक्षक व प्रगतशील बागायतदार कल्याणी गंगोडा सरांचे व्यक्तीमत्व म्हणजे समाजाला निस्वार्थ सेवा देणारं व्यक्तीमत्व असल्याचे प्रतिपादन येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक व स्विमींग ग्रुपचे संस्थापक महेश इंगळे यांनी केले.
आज आदर्श शिक्षक कल्याणी गंगोडा यांचा वाढदिवस स्विमींग ग्रुपच्या वतीने मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी स्विमिंग ग्रुप परिवाराच्या वतीने संस्थापक महेश इंगळे यांनी कल्याणी गंगोडा सरांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, पुष्पहार, पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करुन कल्याणी गंगोडा सरांना वाढदिवसाच्या शुभेछा व्यक्त केल्यानंतर संस्थापक महेश मालक इंगळे बोलत होते.
पुढे बोलताना महेश इंगळे मालकांनी सांगितले की कल्याणी गंगोडा यांनी शिक्षण आणि शेती या दोन्ही क्षेत्रात केलेले कार्य इतरांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या सेवेला समाजाभिमुख कौतुकाची थाप लाभावी याकरीता स्विमींग ग्रुपच्या वतीने त्यांच्या वाढदिवसानिमीत्त आज येथे कल्याणी गंगोडा सरांचा सन्मान करून त्यांच्या सेवाभावी वृत्तीला बळ देण्याचे कार्य करण्यात आले असल्याचे मनोगतही व्यक्त केले.
यावेळी उपस्थित स्विमींग ग्रुप सदस्यांनी गंगोडा यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे आयोजन आणि सूत्रसंचालन स्विमिंग ग्रुप परिवाराच्या सदस्यांनी केले.
यावेळी स्विमिंग ग्रुपचे सदस्य संतोष पराणे, नगरसेवक अविनाश मडीखांबे, जगताप सर, दत्ता कटारे, विश्वनाथ देवरमनी, सुनिल पवार, बाळासाहेब एकबोटे, कुमार हत्तुरे, अशोक कलशेट्टी, सिद्धाराम पाटील, सिद्धू बिडवे इत्यादी उपस्थित होते.


