पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर तालुक्यातील भटके विमुक्त विकास परिषद महाराष्ट्र प्रदेश यांच्यावतीने रोपळे तालुका पंढरपूर येथे रामोशी समाजासाठी विविध शासकीय दाखले देण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन 5 मे रोजी करण्यात आले होते.
हे शिबिर भटके विमुक्त विकास परिषदचे संघटन मंत्री राहुल चव्हाण व प्रदेशाध्यक्ष उद्धव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आले.यासाठी जिल्हाधिकारी कार्तिकेय, निवासी जिल्हाधिकारी अभिजीत पाटील, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे गणेश सोनटक्के साहेब, पंढरपूरचे तहसीलदार सचिन लंगोटे यांचे विशेष सहकार्य लाभले या शिबिराचे उद्घाटन नायब तहसीलदार बालाजी पुदलवाड यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी भटके विमुक्त विकास परिषद चे जिल्हा अशासकीय सदस्य व अभियान प्रमुख सुनील पवार पंढरपूर तालुका संयोजक प्रशांत सापनेकर, सह सहसंयोजक सुवर्णा पवार मंडल अधिकारी बाळासाहेब कदम तालुका पुरवठा अधिकारी बादल , आदी अधिकारी उपस्थित होते. यावेळी जय मल्हार क्रांती संघटनेचे अध्यक्ष अंकुश जाधव, दादा जाधव, ओंकार जाधव, परमेश्वर जाधव, विवेक जाधव आदींचे सहकार्य लाभले.
यावेळी 104 लाभार्थ्यांना विविध प्रकारचे दाखले काढून देण्यात आले.


