पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
वस्तूवर छापलेल्या अवाजवी एमआरपी किमती द्वारे सुरू असलेली ग्राहकांची लूट थांबवण्यासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायत वतीने देशव्यापी आंदोलन सुरू केले आहे अशी माहिती तालुकाध्यक्ष नंदकुमार देशपांडे, उपाध्यक्ष प्रशांत माळवदे, सचिव महेश भोसले, आझाद अल्लापूरकर यांनी दिली.
ग्राहकांना योग्य दरात वस्तू व सेवा मेळाव्यात म्हणून वस्तूची किरकोळ विक्री ची कमाल किंमत छापण्याचे शासनाने बंधनकारक केले. परंतु याचा गैरफायदा घेत अवाजवी एमआरपी छापून ग्राहकाची लूट चालू असल्याचे दिसून येते. ग्राहकांची लूट थांबवण्यासाठी मागील दोन वर्षापासून ग्राहक पंचायत विविध पातळीवर प्रयत्न करीत आहे परंतु शासनाकडून अद्याप योग्य प्रतिसाद मिळाला नसल्याने आंदोलन अधिक तीव्र करण्याचे ग्राहक पंचायत वतीने ठरविण्यात आले आहे त्याचाच एक भाग म्हणून एक मे पासून देशभरातील ग्राहकाकडून अवाजवी एमआरपी विरुद्ध पंतप्रधान. अर्थमंत्री. वाणिज्य मंत्री. ग्राहक संरक्षण मंत्री यांना राज्यभरातून लाखो ई-मेल पाठविण्यात येत आहेत. दैनंदिन गरजेच्या वस्तू विशेषतः पॅकिंग केलेल्या वस्तू कापड. इलेक्ट्रॉनिक वस्तू.. औषधे इत्यादी अनेक वस्तूवर 200% ते 300% अवाजवी एमआरपी छापल्याने जास्त पैसे देऊन ग्राहक थकला आहे. वाजवी एमआरपी हा ग्राहकांचे खिसे रिकामे करण्याचा एक कायदेशीर मार्ग झाला आहे.
यामुळे ग्राहकातून संताप व नाराजी व्यक्त होत आहे ग्राहकाची सहनशीलता संपली संपत आलेली आहे हीच बाब लक्षात घेऊन अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने(Abgp,) पंतप्रधान कार्यालय (pmo) आणि अर्थमंत्री. ग्राहक संरक्षण मंत्री. वाणिज्य मंत्री यांना सध्याचा एमआरपी कायदा रद्द करण्यासाठी आणि उत्पादन खर्च वरील नफा २०_३०% पर्यंत मर्यादित ठेवण्यासाठी कायदा करावा यासाठी एक निवेदन पाठवले जाणारा असून त्याच्याप्रती दिनांक 11 मे 26 रोजी राज्यातील सर्व तहसीलदार प्रांताधिकारी जिल्हाधिकारी यांना दिल्या जाणार आहेत.
तसेच 20 मे पर्यंत देशभरातील ग्राहकामार्फत पंतप्रधानांना एमआरपी विरुद्ध ई-मेल पाठवण्यात येणार आहे व दिनांक 25 मे 26 रोजी नवी दिल्ली येथील जंतर मंतर या ठिकाणी सत्याग्रह/धरणे आंदोलन केले जाणार आहे यासाठी देशभरातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत अशी माहिती तालुकाध्यक्ष नंदकुमार देशपांडे जिल्हाध्यक्ष शशिकांत हरिदास दीपक इरकल विनोद भरते विनय उपाध्ये सुहास निघते यांनी दिली.
तरी ग्राहक ग्राहक पंचायतीने पुकारलेल्या या देशव्यापी आंदोलनात https:,,//tinyurl.com/StopMTPLOot या लिंक द्वारे ई-मेल करून जास्तीत जास्त ग्राहकांनी सहभागी व्हावे असे आवाहन पंढरपूर तालुका व जिल्हा ग्राहक पंचायत च्या वतीने जिल्हाध्यक्ष शशिकांत हरिदास तालुका अध्यक्ष नंदकुमार देशपांडे प्रांत सचिव दीपक इरकल प्रांत सदस्य विनोद भरते सुभाष सरदेशमुख जिल्हा सचिव सुहास निकते,तालुका सचिव महेश भोसले आझाद अल्लापुरकर उपाध्यक्ष प्रशांत माळवदे तालुका सदस्य शशिकांत सुगंधी, शहाजी जाधव मंगेश देशपांडे सागर कोळी सागर शिंदे सदस्यांनी केले आहे.


